‘भाईंदर (जिल्हा ठाणे) येथील उत्तान डोंगरीमधील सरकारी भूमीवर बालेशा पीर दर्गा बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. त्यासाठी या जागेवरील खारफुटी नष्ट करण्यात आली. या अतिक्रमित बांधकामाची खोटी कागदपत्रे दाखवून दर्ग्याचे नाव जागेच्या ७/१२ उतार्यावर चढवण्यात येणार होते. यासाठी दर्ग्याच्या ट्रस्टचे सचिव अब्दुल कादिरी कुरेशी याने अर्ज केला होता; पण ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी या प्रकरणी वेळीच हस्तक्षेप केला. यामुळे अपर (अतिरिक्त) तहसीलदारांनी दर्ग्याचे नाव नोंदवण्यास विरोध करत संबंधित अर्ज नाकारला. यासंदर्भात अधिवक्ता खंडेलवाल यांनी आरोप केला आहे की, भाईंदरचे विभागीय अधिकारी दीपक अहिरे आणि तलाठी रमेश फपाले यांनी दर्ग्याला संमती देण्यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये खोटा अहवाल सादर केला होता.’