इतिहासाचे पुनर्लेखन हवेच !

साम्यवादी इतिहासकारांनी त्यांच्या पूर्वग्रहदूषित आणि हिंदुद्वेषी मानसिकतेच्या चष्म्यातून भारतीय इतिहासाकडे पाहिल्याने त्यांना येथील पराक्रमी राजे दिसलेच नाहीत किंवा त्यांना मोगल ‘प्यारे’ वाटले. आता शासनांनी दैदीप्यमान अन् गौरवशाली इतिहास भारतियांना अवगत करावा, ही अपेक्षा !

इतिहासकारांनी भारतीय संदर्भांतून इतिहासाचे पुनर्लेखन करावे ! – अमित शहा यांचे आवाहन

इतिहासकारांना भारतीय संदर्भांतून इतिहासाचे पुनर्लेखन केले पाहिजे. सरकार त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल. इतिहास योग्य प्रकारे आणि वैभवशाली पद्धतीने मांडण्यापासून आम्हाला कोण रोखणार आहे ?

‘हनीट्रॅप’, गूढ आणि काँग्रेसचे मौन !

ब्रिटिशांकडे ‘आपल्याच पंतप्रधानांच्या रंगेलपणाचे पुरावे मागणे’, ही गोष्ट भारतासाठी निश्चितच शोभनीय नाही. नेहरू आणि एडविना यांच्या प्रेमप्रकरणाचा चोथा चघळत बसण्यापेक्षा या ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून काही राष्ट्रविरोधी कारवाया झाल्या का ? याचे संशोधन मात्र व्हायला हवे !

झाशीच्या राणीने दिलेला लढा आणि तिचे दिव्य हौतात्म्य !

झाशीच्या राणीच्या शौर्यावरील आक्षेप आणि खंडण – ‘आपल्या देशात इतिहासाची मोडतोड करून इतिहासाला विकृत करण्याची स्पर्धा चालू आहे का?, असा संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुणीही उठतो आणि ऐतिहासिक पुरुष आणि त्यांचे शौर्य यांविषयी संदेह निर्माण करतो.

वैदिक विमानविद्या संशोधक पंडित शिवकर तळपदे यांचा जीवनप्रवास

निःस्पृह वृत्तीधारकांच्या मांदियाळीत साजेल, असे एक नाव म्हणजे पंडित शिवकर बापूजी तळपदे ! त्यांच्या कार्याची अमूल्यता, बहुविधता आणि गौरव हा त्यांनी केलेली अथक अभ्यास अन् परिश्रम यांना जाणल्यावाचून आपल्यापर्यंत पोचू शकत नाही.

आर्यभट्ट यांनी १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी पृथ्वीचा व्यास मोजला !

‘विशेष म्हणजे पृथ्वी गोल आहे, हे युरोपमधील शास्त्रज्ञांनी प्रथम शोधून काढले’, असे सर्वत्र मानले जात असले, तरी ही वस्तूस्थिती भारतियांना त्यापूर्वीच ठाऊक होती. आर्यभट्ट यांनी ख्रिस्ताब्द ५०० मध्ये ‘या गोल पृथ्वीचा व्यास सुमारे ४० सहस्र १६८ किलोमीटर’ म्हणून मोजून काढला.

धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

‘आजकाल सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा ट्रेंड (प्रथा) चालू झाला आहे. कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’, अशी चेतावणीही ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांनी दिली.

(अज्ञानी) पुरुष !

‘आताच्या पिढीची आवड वेगळी आहे’, असे गृहित धरून तिच्यासमोर वेगळ्या अंगाने रामायण मांडण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल, तर ‘तो अज्ञानीच आहे’, असे म्हणावे लागेल. अशा अज्ञानींना योग्य ज्ञान करवून देण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी घेतलेला पुढाकार योग्य म्हणावा लागेल ! आधुनिकतेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचे अयोग्य चित्रण अस्वीकारार्ह !

पाश्चात्त्यांनी भारताला लुटले…!

भारतियांचे डोळे उघडण्याचे काम पुन्हा एका साम्यवाद्यानेच केले आहे, हे विशेष ! आता एवढ्यावरच न थांबता इंग्रजांनी लुटलेल्या भारताच्या सर्व संपत्तीचा हिशोब करून ती सव्याज वसूल करणे, हे मोठे राष्ट्रकार्य शासनकर्त्यांनी करून भारताचा गौरव वाढवावा, ही अपेक्षा !

‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीचे आचरण करणारे लालबहादूर शास्त्री !

भारतियांना एकभुक्त रहाण्याचे आवाहन करण्यापूर्वी ‘स्वतःचे कुटुंबीय तसे राहू शकतात का ?’, याविषयी शास्त्रीजींनी पडताळणी करणे….