इतिहासकारांनी भारतीय संदर्भांतून इतिहासाचे पुनर्लेखन करावे ! – अमित शहा यांचे आवाहन

इतिहास योग्य प्रकारे मांडण्यापासून आम्हाला कोण रोखणार ? – शहा यांचा प्रश्‍न

इतिहास योग्य प्रकारे आणि वैभवशाली पद्धतीने मांडण्यापासून आम्हाला कोण रोखणार आहे ? – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. आपल्या इतिहासाची मोडतोड करून तो मांडण्यात आल्याचे मी अनेकदा ऐकले आहे. हे कदाचित् सत्य असू शकते. त्यामुळे आपल्याला आता यात दुरुस्ती केली पाहिजे. इतिहासकारांना भारतीय संदर्भांतून इतिहासाचे पुनर्लेखन केले पाहिजे. सरकार त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल. इतिहास योग्य प्रकारे आणि वैभवशाली पद्धतीने मांडण्यापासून आम्हाला कोण रोखणार आहे ? असा प्रश्‍न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथील विज्ञान भवनामध्ये १७ व्या शतकातील अहोम साम्राज्याचे सेनापती लचित बोरफुकन यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात केला.

विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना उद्देशातून अमित शहा म्हणाले की, भारतावर १५० हून अधिक वर्षे राज्य करणार्‍या ३० राजवंशांविषयी आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार्‍या ३०० नामवंत व्यक्तीमत्वांविषयी संशोधन केले पाहिजे. इतिहासाचे पुनर्लेखन झाल्यानंतर खोट्या गोष्टींचा प्रचार होणार नाही.