गोव्याशी निगडित महत्त्वाची मूळ पोर्तुगीज कागदपत्रे पोर्तुगालमधून गोव्यात आणणार ! – पुरातत्व मंत्री फळदेसाई

‘‘पोर्तुगालकडून पाहिजे असलेल्या कागदपत्रांची सूची सिद्ध झाल्यानंतर गोवा सरकार केंद्रशासनाच्या माध्यमातून पोर्तुगालशी संपर्क करणार आहे. गोव्याशी संबंधित कागदपत्रे गोव्याला  मिळाली पाहिजेत. याद्वारे अनेक गुपिते उघड होणार आहेत.’’

पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली होती !

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची सूची सिद्ध करण्यासाठी तज्ञांचा सहभाग असलेल्या समितीचा अंतरिम अहवाल सरकारला सुपुर्द – पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव !

पुराणकाळात भारतात विमाने आणि अन्य वाहने आकाशत उडत असल्याची पुस्तिकेत माहिती !

‘चंद्रयान-३’ मोहिमेचे यश विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने प्रकाशित केली पुस्तिका !

खैबरखिंडीत दुर्ग अभ्‍यासक अधिवक्‍ता मारुति गोळे यांनी भगवा ध्‍वज फडकावला !

पुरातन व्‍यापारी मार्गासह भारताच्‍या इतिहासात आक्रमकांची वाट म्‍हणून जिच्‍याकडे पाहिले जाते, त्‍या अफगाणिस्‍तान-पाक सीमेवरील खैबरखिंडीत दुर्ग अभ्‍यासक अधिवक्‍ता मारुति गोळे यांनी भगवा ध्‍वज फडकावला. पिरंगुट (ता. मुळशी) येथील गोळे सध्‍या अफगाणिस्‍तान येथे दुर्ग मोहिमेवर आहेत.

पोर्तुगीज काळात गोव्यात बळजोरीने धर्मांतर झाले ! – डॉ. भूषण भावे

‘‘इन्क्विझिशन’चा कालखंड अत्यंत कठीण होता. या काळात हिंदु धर्माची अवहेलना आणि धार्मिक संस्थांवर अत्याचार झाले. या कालखंडात धर्मसंस्थांनी सोसलेल्या अत्याचाराचा संदर्भ ‘गोंयात जाल्ले धर्मांतर – कथा आणि व्यथा’ या पुस्तकातून मिळतो.’’

सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामाला वेग

राज्यशासन आणि नौदल यांनी निश्चित केलेल्या भूमीवर पुतळा उभारणी अन् सुशोभीकरण यांचे काम चालू ! या अनुषंगाने नौसेनेचे वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी राजकोट किल्ल्याची पहाणी केली.

पंडित नेहरू यांनी वर्ष १९४६ मध्येच इंग्लंडचा राष्ट्रध्वज खाली उतरवत भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, वरिष्ठ पत्रकार

या वेळी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले, ‘‘पुस्तकांमध्ये नेहरू यांना मोठे करण्यात आले. ‘नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करावा’, असे त्यांचे एकही काम नाही. नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करणे ही, भारतियांची फसवणूक आहे.

ज्ञानवापीचे सर्वेक्षण थांबवण्याची मुसलमान पक्षाची मागणी न्यायालयाने फेटाळली

‘हे सर्वेक्षण अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार केले जात आहे. त्यामुळे या न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

भारताच्‍या नावाचा इतिहास जम्‍बुद्वीप, आर्यावर्त ते ‘इंडिया’!

भारताला आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर ‘इंडिया’ या नावाने ओळखले जाते आणि या नावाचा इतिहासही मोठा आहे. तथापि प्राचीन काळापासून भारताला वेगवेगळ्‍या७ नावांनी ओळखले जात असे. आता पुन्‍हा एकदा ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या विषयावर चर्चा होत आहे. भारतीय राज्‍यघटनेच्‍या पहिल्‍याच कलमामध्‍ये ‘इंडिया दॅट इज भारत (इंडिया जो भारत आहे)’, असा उल्लेख केला आहे. त्‍यामुळे इंग्रजीमध्‍ये ‘इंडिया’ आणि भारतीय … Read more

स्थलांतरित भारतीय !

आज विदेशात भौतिक सुख मिळत असले, तरी मनःशांती नाही. नैतिकतेचाही र्‍हास झालेला आहे. या दोन्ही गोष्टी हिंदु धर्मात आहेत. याच्या बळावर भारत जगाला दिशादर्शन करू शकतो. भौतिक सुविधा निर्माण करण्यास भारताला अनेक वर्षे लागू शकतील; मात्र साधनेच्या माध्यमांतून भारत विश्‍वगुरु होऊ शकतो !