सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामाला वेग

व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी राजकोट किल्ल्याची केली पहाणी

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारणीचे चालू असलेले काम

मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबर या दिवशी नौसेना दिन साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वी येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर ३५ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. राज्यशासन आणि नौदल यांनी निश्चित केलेल्या भूमीवर पुतळा उभारणी अन् सुशोभीकरण यांचे काम चालू करण्यात आले आहे. या अनुषंगाने ८ ऑक्टोबर या दिवशी नौसेनेचे वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी राजकोट किल्ल्याची पहाणी केली.

नौसेनेचे वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला

या वेळी नौसेनेचे अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगोड आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


हे ही पहा –

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर उभारण्यात येणार !
https://sanatanprabhat.org/marathi/725343.html