पंचांग म्हणजे जणू समाजजीवनाचा एक अविभाज्य घटक !
‘हिंदु समाजात दैनंदिन जीवनात कोणतेही महत्त्वाचे काम करण्याआधी काळ, वेळ आणि दिवस पाहिला जातो, मग ते व्रत किंवा उत्सव असो, घरात नुकतेच जन्मलेले मूल असो, नूतन घराची वास्तूशांत करायची असो किंवा नवीन व्यवसायाचा आरंभ करायचा असो. फार पूर्वीपासून हिंदूंमध्ये ही परंपरा आहे.