पुणे जिल्ह्यात नववर्षानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन उत्साहात पार पडले !

आळंदेवाडी येथील गुढी

पुणे – हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हिंदु जनजागृती समितीकडून पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणच्या शाळा, सोसायटी, तसेच मंदिरांमध्ये गुढीपाडव्याविषयी प्रवचन घेण्यात आले, तसेच ‘गुढी कशी उभारावी ?’, याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधन करण्यात आले. ठिकठिकाणी फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून गुढीपाडव्याविषयी माहिती देण्यात आली. सहस्रो धर्मप्रेमींनी उपक्रमाचा लाभ घेतला. या वेळी रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली आणि सर्वांनी उत्साहात रामराज्याच्या घोषणा दिल्या.

सिद्धिविनायक मंदिर कात्रज गांव येथे रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेताना
सिद्धिविनायक मंदिर कात्रज गांव

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आलेले सामूहिक गुढीपूजन !

श्री राधाकृष्ण मंदिर, हडपसर, हिवरे गाव, पारगाव (सा.मा.), तालुका दौंड; मोई गाव, शिंदेवाडी गाव, पारगाव, दौंड; वाघाळवाडी सासवड, म्हसोबा देवस्थान कोडीत, कात्रज, केंजळ, तालुका भोर; चंदननगर; आळंदेवाडी आदी १३ हून अधिक ठिकाणी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले.

सामूहिक गुढी पूजन, चंदन नगर
सामूहिक गुढी पूजन, चंदन नगर
भोर येथील गुढी

वैशिष्ट्यपूर्ण !

१. केंजळ, तालुका भोर येथील धर्मप्रेमी युवकांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त श्रीराम मंदिराची स्वच्छता केली.

२. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, चंदननगर, पुणे येथे गुढीपाडव्यानिमित्त सामूहिक गुढीपूजन करून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा सर्वांकडून घेण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने सकल हिंदु समाज, रा. स्व. संघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.