डोंबिवलीत ‘हिंदु ग्राहक जागृती अभियाना’चा शुभारंभ !

डोंबिवली – व्यावसायिक क्षेत्रात जशी हलाल प्रमाणित उत्पादने सर्रास विकली जातात, तसे शासनाने ‘ओम प्रमाणपत्रा’ला मान्यता देऊन हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे की, हे इस्लामिक राष्ट्र नसून हिंदवी स्वराज्य आहे. आता हे आपल्याला जगालाही ठणकावून सांगायचे आहे. त्यासाठीच गुढीपाडव्याचा मुहूर्त आपण साधला आहे. ही गुढी उंचच उंच आभाळापर्यंत पोचली पाहिजे. या माध्यमातून हिंदूंचे मोठे संघटन झाले, तर त्यातून चांगला संदेश जगापर्यंत जाईल. यातून विश्वगुरुपदाचा मान आपल्याला मिळेल, हेच आपले अंतिम उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर यांनी केले. येथील नववर्ष स्वागतयात्रेत स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, डोंबिवली शाखा आणि ‘ओम प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदु ग्राहक जागृती अभियानाचा शुभारंभ येथील शिदोरी उपाहारगृहाजवळ करण्यात आला. त्या अंतर्गत ‘ओम प्रमाणित ग्राहकांची विनाशुल्क नोंदणी चालू करण्यात आली.

आर्थिक लढाईत जिंकायचेच आहे ! – सौ. मंजिरी मराठे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा आणि ‘ओम प्रतिष्ठान’च्या संस्थापिका-अध्यक्षा
‘हिंदूंपासून हिंदूंपर्यंत’ ही ओम प्रतिष्ठानची संकल्पना आहे. हिंदूंच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे, या जाणिवेतून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही ‘ओम प्रमाणपत्र’ वितरीत करत आहोत. आपण हिंदु ग्राहक अभियानाचाही शुभारंभ केला आहे. त्यात प्रत्येक हिंदूने ग्राहक म्हणून नोंदणी करायची आहे. ‘संख्याबळ हीच हिंदूंची शक्ती आहे’, या सावरकरांच्या विचारांशी अनुसरून हिंदूसंघटनाचे कार्य करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे आपण रक्षण करून त्याचे रूपांतर हिंदु राष्ट्रात करूया. ही नांदी आर्थिक युद्धाची आहे आणि त्यात आपल्याला जिंकायचेच आहे. प्रत्येक हिंदूने व्यावसायिक आणि ग्राहक यांना मोठ्या संख्येने ‘www.ompratishthan.org’वर नोंदणी करण्यास सांगावी.
‘हिंदूंनो, जागे व्हा’, हे सांगावे लागणे दुर्दैवी ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रसिद्ध जागतिक व्याख्याते, प्रवचनकार, लेखक, इतिहास अभ्यासक

‘रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग’, असे तुकोबांनी आम्हाला सांगून ठेवले आहे. त्याप्रमाणे आपण विविध युद्धाचे प्रसंग पहातच आहोत. गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूस प्रारंभ. ओम प्रतिष्ठान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान यांच्या या चळवळीत प्रत्येक हिंदु व्यावसायिकाने सहभाग घेतला पाहिजे. अनेकांपर्यंत ही चळवळ पोचवली पाहिजे. हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी-विक्री व्यवहार करायला हवा.
ओम प्रमाणपत्र चळवळीला हिंदु जनजागृती समितीचा पाठिंबा ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जागृती अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वदेशी चळवळ चालू झाली होती आणि स्वातंत्र्याच्या मोहिमेला योगदान प्राप्त झाले, अशाच प्रकारे ओम प्रमाणपत्राच्या माध्यमातून ही चळवळ चालू झाली आहे. ओम प्रमाणपत्राची आवश्यकता समजण्यासाठी हलाल प्रमाणपत्रामागील षड्यंत्र जाणून घ्यावे लागेल. थुंकी लावून किंवा फुंकर घालून भेसळयुक्त अन्न हिंदूंना खाऊ घालणे, हे हलाल जिहादच्या माध्यमातून चालणार्या हिंदुविरोधी षड्यंत्रापासून वाचण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या पुण्यभूमीतून ओम प्रमाणपत्राच्या माध्यमातून चालू झालेली चळवळ संपूर्ण जगभरात पसरेल आणि प्रत्येक हिंदु ग्राहक अन् विक्रेता ओम प्रमाणित असेल, याची आम्हाला निश्चिती आहे. हिंदु जनजागृती समितीचा या चळवळीला पाठिंबा आहे.
हिंदु जागृतीचा शुभारंभ ही हिंदूसंघटनेची नांदी ! – श्रीनिवास कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था
अल्पसंख्यांक विक्रेतेही अल्प पैशांत माल देत असल्याने हिंदू त्यांच्याकडे अधिक गर्दी करतात. हिंदु ग्राहकांना जागृत करणे, हिंदु व्यावसायिकांना जागृत करणे, यांसाठी आम्ही या स्वागतयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालो आहोत. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आणि ‘ओम प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला हिंदु ग्राहक जागृती अभियानाचा शुभारंभ ही हिंदूसंघटनेची नांदीच आहे.
सहभागी संस्था आणि मान्यवर : स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे डोंबिवली शहर प्रमुख श्री. मंगेश राजवाडे, प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक श्री. अमोल कोगेकर, ओम प्रतिष्ठानचे समन्वयक श्री. प्रसाद वडके, ‘ध्रुव अकॅडमी’चे संचालक श्री. विनोद देशपांडे आणि सौ. वृषाली देशपांडे, प्राचार्य डॉ. विनय भोळे, सनातन संस्थेच्या सौ. अमृता संभूस
सहकार्य : या कार्यक्रमासाठी रघुवीर नगर गणेशोत्सव मंडळाचे डोंबिवली अध्यक्ष श्री. बिनेश नायर आणि मंडळाचे सदस्य यांचे विशेष योगदान लाभले.
सत्कार : डोंबिवलीतील प्रथम ओम प्रमाणित उद्योजक शिदोरी उपाहारगृहाचे संचालक श्री. अद्वैत जोशी यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.