हिंदूंना न्याय मिळण्यासाठी देशात ‘एन्.आर्.सी.’ लागू झालीच पाहिजे ! – डॉ. सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी

हिंदु एकता आंदोलनाच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’चे आवाहन !

सांगली, ३१ मार्च (वार्ता.) – ७१ देशांमधील घुसखोर भारतात रहात असून देशातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी हात-पाय पसरले आहेत. त्यांचा प्रचंड मोठा धोका सध्या देशासमोर आहे. धर्मांधांची, घुसखोरांची गतीने वाढणारी लोकसंख्या हा चिंतेचा विषय असून हिंदूंचा जननदर पहाता येणार्‍या १० वर्षांत हिंदू अल्पसंख्य होतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे घुसखोरांना या देशातून बाहेर काढण्यासाठी आणि हिंदूंना न्याय मिळण्यासाठी देशात ‘एन्.आर्.सी.’ (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी प्रक्रिया) लागू झालीच पाहिजे, असे आवाहन ‘सुदर्शन वाहिनी’चे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी केले. ते गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने मारुति चौक येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते.

मेळव्याच्या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. सुरेश चव्हाणके, तसेच उपस्थित हिंदू

या मेळाव्यात हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’चे आवाहन करण्यात आले आणि त्यासाठी ‘प्रशासनासमवेत नागरिकांनीही पुढाकार घ्यावा’, असे आवाहन करण्यात आले. डॉ. चव्हाणके यांनी त्यांच्या भाषणात ‘मुस्लीम लोकसंख्या नियंत्रण कायद्या’ची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसंगी भाजपचे श्री. पृथ्वीराज पवार, हिंदु एकताचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई यांसह अन्य मान्यवर, तसेच हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी तलवार आणि अफझलखानाचा कोथळा बाहेर काढलेले चित्र देऊन डॉ.सुरेश चव्हाणके यांचा सत्कार करण्यात आला. हेच चित्र श्री. गोपीचंद पडळकर यांनाही भेट देण्यात आले. यानंतर अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे आणि हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

श्रीराम मंदिर चौकात भगवा ध्वज उभारून सुशोभीकरण करणारच – आमदार गोपीचंद पडळकर

भाजपचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘येथील श्रीराम मंदिर चौकात भगवा ध्वज उभारण्यात येणार असून चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ते करण्यासाठी पोलीस प्रशासन अनुमती देत नाही. हे सुशोभीकरण आम्ही करणारच आहोत.’’ यानंतर डॉ. सुरेश चव्हाणके त्यांच्या भाषणात म्हणाले, ‘‘पोलीस प्रशासन कायदा-सुव्यवस्था आणि अन्य कारणे सांगून अनुमती देत नाही, हे आश्चर्यकारक आहे. हा कार्यक्रम झाल्यावर आम्ही तेथे जाऊन भगवा झेंडा लावणार आहे. बघूया आम्हाला कोण अडवते ते ?’’ यानंतर कार्यक्रम संपेपर्यंत पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन हे ३१ मार्चपर्यंत भगवा झेंडा लावण्यास आणि सुशोभीकरण करण्यास अनुमती देतील, असा निरोप पोलीस प्रशासनाकडून आयोजकांना पोचवण्यात आला.

जेव्हा हिंदु धर्माचा विषय येतो, तेव्हा मी केवळ ‘हिंदु’ असतो ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

आज हिंदु धर्मातील युवती, मुली यांना ‘लव्ह जिहाद’साठी लक्ष्य केले जात आहे. धर्मांतराची समस्या ‘आ’वासून उभी आहे. अशा प्रसंगी हिंदूंनी पेटून उठले पाहिजे आणि अशा गोष्टींचा ठामपणे विरोध केला पाहिजे. जेव्हा हिंदु धर्माचा विषय येतो, तेव्हा मी केवळ ‘हिंदू’ असतो आणि आपणही जातींमध्ये न अडकता हिंदू म्हणून आपल्या बांधवांना साहाय्य करा, असे आवाहन भाजपचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी केले.

१. माझ्यावर १ सहस्र ८३१ प्रथमदर्शी गुन्हे नोंद असून हिंदुत्वासाठी कितीही खटले मी अंगावर घ्यायला सिद्ध आहे !

२. सांगली जिल्ह्यात पावणेतीन लाखांपेक्षा अधिक घुसखोर असून येथील हिंदू जागृत न झाल्यास सांगलीची भिवंडी, नागपूर, मुंब्रा होण्यास वेळ लागणार नाही.

– डॉ. सुरेश चव्हाणके

संपादकीय भूमिका

महाराष्ट्र राज्य ‘घुसखोरांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाऊ नये, यासाठी हिंदूंनी वेळीच जागृत व्हावे !