वक्फ दुरुस्ती विधेयक, हे मुसलमानांच्या अधिकारांवर आघात असल्याचा आरोप

भटकळ (कर्नाटक) – वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात भटकळमधील मुसलमानांनी शुक्रवारी नमाजपठणानंतर हाताला काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने केली. भटळमधील मुसलमानांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध दर्शवत ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ला (ए.आय.एम्.पी.एल्.बी.) पाठिंबा घोषित केला.
नवायत कॉलनी तंजीम जामिया मशिदीबाहेर बोलतांना मजलिस-ए-इस्लाह आणि तंजीमचे अध्यक्ष इनायतुल्ला शाबंद्रि यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक मुसलमानांच्या अधिकारांवर थेट आघात असल्याचे सांगत त्याचा तीव्र निषेध केला. हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली. विधेयकाच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी मजलिस-ए-इस्लाह आणि तंजीम लवकरच भटकळमध्ये भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संपादकीय भूमिकाहिंदूंची घरे, मंदिरे आदींच्या भूमींवर वाटेल तेव्हा, वाटेल तसा दावा सांगून त्या बळकावणे, हा मुसलमानांचा अधिकार कसा असू शकतो ? उलट हा प्रकार हिंदूंच्या जगण्याचा मूलभूत अधिकार हिरावणारा आहे ! |