‘हिंदुफोबिया’चे समूळ उच्चाटन करा !

हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले होते. अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी आणि ‘हिंदुफोबिया’च्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

गोमंतकातील हिंदुत्वाची धगधगती ज्वाळा प्रा. सुभाष वेलिंगकर !

प्रखर राष्ट्राभिमान, हिंदु धर्मावरील नितांत प्रेम अन् तत्त्वनिष्ठा यांचे गोमंतकातील मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक सुभाष वेलिंगकर ! संघटनांमध्ये उत्तुंग कार्य करूनही गोमंतकातील सर्व हिंदु संघटना, मंदिरे आणि मठ-आश्रम यांना त्यांचा आधार वाटतो. हेच प्रा. वेलिंगकर यांचे व्यापकत्व !

कराड (जिल्हा सातारा) येथे श्री दुर्गामाता दौडीची उत्साहात सांगता

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीची दसर्‍याच्या दिवशी उत्साहात सांगता झाली. येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे पूजन करून, तसेच शस्त्र आणि भगवा ध्वज यांचे पूजन करून दौडीला प्रारंभ झाला.

गोवा : डिचोली येथे श्री दुर्गामाता दौड आणि हिंदु राष्ट्र उभारणीची शपथ !

माता जगदंबेची अखंड कृपा संपादन करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र उभारणीसाठी एक शक्तीचा स्रोत या संपूर्ण परिसरात पसरला आहे, असेच चित्र दिसत होते. नवरात्रोत्सवातील साक्षात श्री दुर्गादेवीचे दर्शनच उपस्थित भाविकांनी अनुभवले !

कराड (जिल्हा सातारा) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने महाआरती !

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हिंदुत्वनिष्ठ एकवटले !

‘पी.एफ्.आय.’वरील बंदीसाठी केंद्रशासनासह राष्ट्रवादी नागरिक आणि संघटना यांचेही अभिनंदन ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, भारत माता की जय संघ

‘पी.एफ्.आय.’ची राजकीय शाखा ‘एस्.डी.पी.आय.’ ही संघटना गोव्यातही फातोर्डा येथे स्थापन झालेली आहे. सरकारने त्यांचीही सखोल चौकशी करून त्यांना कह्यात घ्यावे.

नागपूर येथे छगन भुजबळ यांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन !

२ दिवसांपूर्वी भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलतांना शाळेत होत असलेल्या सरस्वतीपूजनाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते.

सांगली येथे पी.एफ्.आय. या संघटनेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने ! 

स्टेशन चौकातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर भाजप, शिवसेना, हिंदु एकता आंदोलन, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अशा हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २७ सप्टेंबर या दिवशी पी.एफ्.आय.च्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने आणि प्रतिकात्मक पुतळा दहन

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निदर्शने करून पी.एफ्.आय.चा पुतळा जाळण्यात आला. याचसमवेत पाकिस्तानचाही झेंडा जाळण्यात आला. आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना निवेदन देण्यात आले.

कपाळावर टिळा लावला म्हणून वर्गाच्या बाहेर काढणार्‍या मुख्याध्यापिकेची हिंदूंकडे क्षमायाचना !

‘पद्मशाली शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष काशीनाथ गड्डम यांनी सामाजिक माध्यमांसमोर येऊन ‘या घटनेविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची आम्ही दक्षता घेऊ’, असे सांगितले, तर मुख्याध्यापिका अजिता पिल्लाई यांनी घडलेल्या घटनेविषयी क्षमायाचना केली आहे.