सध्या भारत काय किंवा विदेश काय, सर्वत्रचे वातावरण आणि परिस्थिती हिंदूंसाठी भयावह अन् आक्रमक होत चालली आहे. हिंदूंना कुणीही वाली नाही; मात्र असे असतांना ‘हिंदुफोबिया’चा (हिंदूंविषयी द्वेष) गवगवा करून हिंदूंवरच निशाणा साधला जात आहे. ब्रिटनमध्ये मागील मासात लिसेस्टर या उपनगरात पाकिस्तानी मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात ऐमॉस नोरोन्हा या २० वर्षीय तरुणाला बंदी असलेले शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणी १० मासांची शिक्षा सुनावण्यात आली. यात न्याय लवकर झाला, ही तरी जमेची बाजू म्हणावी लागेल. पाकिस्तानी मुसलमानांनी हिंदु आणि त्यांची मंदिरे यांवरही मध्यंतरी आक्रमणे केली. यामुळे भयभीत झालेल्या ९ हिंदु कुटुंबियांनी शहरातून पलायनच केले आहे. ही वृत्ते ढोंगी आणि निधर्मी प्रसारमाध्यमांनी दाखवून ‘हिंदूच कसे चुकीचे आहेत’, याविषयी पोडतिडकीने सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ब्रिटनमध्ये हे सर्व घडण्यामागील मूळ आहे ते म्हणजे यंदाच्या आशिया चषक स्पर्धेतील सामन्यात भारताने पाकचा केलेला पराभव होय ! ‘काश्मीरमधील हिंदूंना ज्याप्रमाणे संपवले, तसेच येथे करा. या कुत्र्यांना (हिंदूंना) चिरडा, हाकलून लावा’, अशा प्रकारच्या पोस्टही (लिखाण) तेथे करण्यात आल्या होत्या. ब्रिटन हा देश जगाला मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य यांचा संदेश नेहमी देतो; मात्र तेथे हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य अन् मानवी हक्क यांची पायमल्ली होणे, हे विद्यमान सरकारला लाजिरवाणे नव्हे का ? देशासाठीही हे दुर्दैवी नाही का ? हे सर्वच गंभीर आणि तितकेच धक्कादायकही आहे. याविरोधात आवाज उठवला, तो ब्रिटनचे विरोधी पक्ष नेते आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टारमर यांनी ! ते म्हणाले, ‘‘अशा आक्रमणांतून ‘हिंदुफोबिया’ पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
देशातील ‘फूट पाडा आणि राज्य करा’, हे राजकारण आम्हाला संपवायचे आहे. हिंदु समाज हा ब्रिटनचा महत्त्वाचा भाग असून तो नेहमीच महत्त्वाचा रहाणार आहे. काही कट्टरतावाद्यांनी सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून हिंदु समाजाविरुद्ध द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. याचा सामना करण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे.’’ ब्रिटनसारख्या देशाचा विरोधी पक्ष नेता आज हिंदूंच्या बाजूने असणे, हे तेथील हिंदूंसाठी काही प्रमाणात तरी आशादायी आहे; कारण संपूर्ण विश्वात आज कट्टरतावादी मुसलमानांनी दहशत निर्माण केली आहे. विश्वाला इस्लामीस्तान बनवण्याचा त्यांचा सुप्त हेतू, नव्हे नव्हे त्यांचे नियोजित षड्यंत्र आहे. ते साध्य होऊ न देणे, हे हिंदूंचे कर्तव्य आणि दायित्व आहे.
ब्रिटनमधील वरील घटना भारतियांसाठी काही नवीन नाही; कारण प्रत्येक भारतीय अशा स्वरूपाचे प्रकार प्रतिदिन अनुभवतच असतो; पण तरीही हिंदूंवरील अन्यायाची काळी बाजू झाकून ‘इस्लाम खतरे में है ।’, ‘वारंवार आम्हालाच लक्ष्य केले जाते’, ‘आमच्यासारख्या अल्पसंख्यांकांवर (प्रत्यक्षात बहुसंख्यांक असतांनाही) अन्याय-अत्याचार होत आहे’, अशी आवई उठवली जाते. खरे पहाता असुरक्षित आहे तो हिंदू ! आजचा हिंदु अतीसहिष्णु आणि असंघटित असल्याचाच अपलाभ सर्वत्रच्या समुदायांकडून उठवला जातो. हिंदूंमध्ये ऐक्य नाही हेच खरे ! जोपर्यंत हिंदूंचे संघटन होत नाही, तोपर्यंत भारतच काय, विदेशातही हे असेच घडत रहाणार ! ज्या दिवशी हिंदू एकत्र येतील, त्या दिवशी धर्मांध, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, जिहादी अशा सर्वांनाच पूर्णपणे माघार घ्यावी लागेल, हे निश्चित !
‘हिंदुफोबिया’ आहे !
ब्रिटनच्या विरोधी पक्ष नेत्याने उच्चारलेल्या ‘हिंदुफोबिया’ या शब्दाकडे कानाडोळा करून चालणार नाही. अनेकदा ‘हिंदुफोबिया अस्तित्वातच नाही’, असे सांगितले जाते; पण आजवर सर्वत्रच्या हिंदूंवर झालेली आक्रमणे, मंदिरांतील चोर्या, देवतांच्या मूर्तींची केली जाणारी विटंबना, हिंदु स्त्रियांवर करण्यात आलेले अनन्वित अत्याचार पहाता ‘हिंदुफोबिया’ अस्तित्वात आहे कि नाही ?’, याची सत्यता पडताळून पहाण्याची आवश्यकताच उरत नाही, तसेच मुसलमानांकडून ‘इस्लामोफोबिया’ला मोठे करण्याचा द्वेषपूर्ण प्रयत्न चालूच आहे.
काही मासांपूर्वी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये ‘हिंदुफोबिया’चे सूत्र उपस्थित करून संपूर्ण विश्वाला सतर्क केले होते. भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती याविषयी म्हणाले, ‘‘अन्य धार्मिक फोबियांविषयी बरेचदा बोलले जाते; पण ‘हिंदुफोबिया’ हाही चिंतेचा विषय आहे. त्याकडे संयुक्त राष्ट्रे आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी लक्ष द्यायला हवे.’’ वर्ष २०२१ मध्ये काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’, या त्यांच्या पुस्तकातून ‘हिंदुफोबिया’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हिंदुत्वाची तुलना ‘इस्लामी स्टेट’ आणि ‘बोको हराम’ या आतंकवादी संघटनांसमवेत केल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुस्तकावर बंदीची मागणीही केली होती.
हिंदुत्वाला वाचवा !
गेल्या काही वर्षांतील ब्रिटनमधील परिस्थितीचा आढावा घेतला, तर तेथे इस्लामी कट्टरतावाद वाढत आहे, हेच दिसून येते. हिंदु मूर्तीपूजक आहेत आणि इस्लाममध्ये ती अमान्य आहे. यास्तवही मुसलमानांकडून हिंदूंना विरोध केला जातो. ‘असे मुसलमान हिंदूंसमवेत कधीतरी एकोपा ठेवून राहू शकतात का ?’, या प्रश्नाचे उत्तर ‘हिंदु-मुस्लिम भाई भाई’चे गोडवे गाणार्यांनी द्यावे; मात्र त्यावर काहीही नियंत्रण न मिळवणार्या ब्रिटन सरकारला हिंदूंनी खडसावले पाहिजे. हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. यावर ‘प्रत्येक वेळी हिंदू कट्टरतावादाचे लक्ष्य होणार नाहीत’, असा ठाम निश्चय करून त्याविरोधात हिंदूंनीही एकजूट दाखवायला हवी. हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले होते. अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी आणि ‘हिंदुफोबिया’च्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
ब्रिटनमधील हिंदूंवर होणारे अत्याचार आणि तेथील अराजकतेवर नियंत्रण न मिळवणार्या सरकारला हिंदूंनी खडसवावे ! |