सांगली येथे पी.एफ्.आय. या संघटनेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने ! 

– सांगली येथे पी.एफ्.आय.च्या विरोधात आंदोलन करतांना श्री. नितीन शिंदे आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते

सांगली, २८ सप्टेंबर (वार्ता.) – पी.एफ्.आय. या आतंकवादी संघटनेवर बंदी घाला, अशी मागणी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केली. स्टेशन चौकातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर भाजप, शिवसेना, हिंदु एकता आंदोलन, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अशा हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २७ सप्टेंबर या दिवशी पी.एफ्.आय.च्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्या प्रसंगी त्यांनी ही मागणी केली. या प्रसंगी भाजप नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, नगरसेविका सौ. उर्मिलाताई बेलवलकर, सर्वश्री अविनाश मोहिते, प्रसाद रिसवडे, श्रीकांत शिंदे, गजानन मोरे, अजय काकडे, अनिकेत माळी, आशिष साळुंखे, रवींद्र वादवणे, विकास आवळे यांसह अन्य उपस्थित होते.