कपाळावर टिळा लावला म्हणून वर्गाच्या बाहेर काढणार्‍या मुख्याध्यापिकेची हिंदूंकडे क्षमायाचना !

सोलापूर येथील जागरूक पालक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा दणका  

डी.आर्. श्रीराम इंग्रजी माध्यम शाळा 

सोलापूर, २५ सप्टेंबर (वार्ता.) – येथील ‘पद्मशाली संस्थे’च्या डी.आर्. श्रीराम इंग्रजी माध्यमातील शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने कपाळाला टिळा लावला; म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिकेने वर्गाच्या बाहेर काढले होते. या प्रकरणाचा पालक आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदुराष्ट्र सेना, धर्मजागरण संघटना, हिंदु जनजागृती समिती अशा विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निषेध केला होता, तसेच ‘त्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करावी’ या मागणीचे प्रशासनाला निवेदन दिले होते. संघटित हिंदूंच्या विरोधाची शाळेच्या संचालक मंडळाने नोंद घेतली आहे. ‘पद्मशाली शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष काशीनाथ गड्डम यांनी सामाजिक माध्यमांसमोर येऊन ‘या घटनेविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची आम्ही दक्षता घेऊ’, असे सांगितले, तर मुख्याध्यापिका अजिता पिल्लाई यांनी घडलेल्या घटनेविषयी क्षमायाचना केली आहे. (हिंदूंनी संघटिपणे विरोध केल्यामुळेच मुख्याध्यापिका आणि पद्मशाली शिक्षण संस्था यांना नमते घ्यावे लागले. यापुढेही हिंदूंनी असे प्रकार झाल्यास सनदशीर मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे. त्याचसमवेत पद्मशाली शिक्षण संस्थेनेही त्यांच्या संस्थेत असे प्रकार यापुढे घडू नये, यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे ! – संपादक)