राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ११.४.२०२१
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालू आहे. या प्रचाराच्या वेळी कर्नाटक राज्यातील चिकमंगळुरू मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांनी ‘तमिळनाडूत भाजपची सत्ता आल्यास सरकारने अधिग्रहित केलेली सर्व मंदिरे परत करू’, असे आश्वासन दिले.
निधर्मी सरकार केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेत आहे. जे सरकारी आस्थापने चालवू शकत नाहीत, ते मंदिरे काय चालवणार ?
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे घेत असलेला धर्मसंवाद हा एक प्रकारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील एक अभ्यासक्रमच आहे.
प्रत्येक देश तेथील धर्माप्रमाणे चालतो; परंतु भारतात तसे होत नाही. जगात एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतही अद्याप ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झालेले नाही. मोदी सरकारने हे कार्य लवकरात लवकर करावे. असे प्रतिपादन महामंडलेश्वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी यांनी केले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ३ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अनी आखाड्यांच्या सर्व पेशवाईंचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे या आखाड्यांच्या साधूसंतांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. या पेशवाईमध्ये महामंडलेश्वर, महंत आणि शेकडो भक्तगण सहभागी होते.
हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यामध्ये राबवत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ या संपर्क अभियानाच्या अंतर्गत श्री. सुनील घनवट यांनी अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाडा, अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा आणि अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा यांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
भारत हे हिंदु राष्ट्रच आहे, त्याला वाचवण्याचे काम करावेच लागेल. हे राष्ट्र निधर्मी केल्याने प्राकृतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. निधर्मी शब्द घुसडण्यात आला आहे, त्याला आमचा विरोध आहे असे मार्गदर्शन हरिनगर येथील भागीरथ धामचे स्वामी श्री महाराज यांनी केले.
तुम्ही जे हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत आहात ते चांगले आहे. हिंदु राष्ट्र आले तरच गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी संकटे दूर होऊ शकतील, असा विश्वास झारखंड येथील गोड्डा जिल्ह्यातील अध्यात्म अन् स्वदेशीचे प्रखर वक्ता, शाही पिठाधीश्वर स्वामी महर्षि मेंहीं हृदय धामचे स्वामी श्रद्धानंद महाराज यांनी येथे व्यक्त केला.