मंदिरे वाचली, तरच धर्म वाचेल अन् धर्म वाचला, तरच राष्ट्र वाचेल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

निधर्मी सरकार इतर कोणत्याही पंथियांची धार्मिक स्थळे कह्यात न घेता केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेत आहे. जे सरकारी आस्थापने चालवू शकत नाहीत, ते मंदिरे काय चालवणार ? प्रत्येक राज्यातील मंदिरांच्या समस्या वेगवेगळ्या असून त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळया प्रकारे लढा देणे आवश्यक आहे; पण सरकारी हस्तक्षेप हा या समस्यांचा सामायिक प्रश्‍न आहे. यावर राष्ट्रीय आंदोलन उभे करू शकतो. स्थानिक स्तरावर मंदिर संस्कृती विषयक फलक लावणे, मंदिर रक्षण समितीची स्थापना करणे, असे प्रयत्न करायला हवेत. भाविक, श्रद्धाळू, पुजारी, मंदिरांचे विश्‍वस्त, स्थानिक राजकीय नेते यांच्या साहाय्याने मंदिरांचे रक्षण करण्यासाठी कटीबद्ध होऊया. मंदिरे वाचली, तर धर्म वाचेल. धर्म वाचला, तर राष्ट्र वाचेल. म्हणूनच आपण सर्वांनी योगदान देऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करूया.