मद्याची दुकाने आणि बार यांना देवतांची नावे देण्यास बंदी !

मद्याची दुकाने आणि बार यांना देण्यात येणारी हिंदूंच्या देवतांची नावे हटवण्यात यावीत, यासाठी हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रयत्नशील होती. यासाठी समितीने निवेदने देणे, जागृती करणे यांसारखे उपक्रम राबवले. या निर्णयामुळे समितीच्या या मोहिमेला यश मिळाले आहे, असेच म्हणावे लागेल.

एस्.टी. महामंडळाच्या ‘विठाई’ बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र हटवणार !

एस्.टी. महामंडळाच्या विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकणे, मळ लागणे असे प्रकार होत असल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र हटवण्याची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती.

हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने सोलापूर येथे देवतांच्या प्रतिमांचे विधीवत् अग्निविसर्जन !

गणपति मंदिराच्या बाहेर विविध लोकांनी घरातील देवतांच्या जुन्या प्रतिमा ठेऊन दिल्या होत्या. त्यामुळे देवतांची विटंबना होत होती.

पिसोळी (पुणे) येथे असलेल्या सांकला विस्टा सोसायटीमधील स्थापित श्री गणेशमूर्ती पोलिसांनी हटवली !

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशी घटना घडणे अपेक्षित नाही. हिंदु देवतांच्या मूर्ती असुरक्षित असणे गंभीर आहे.

राजस्थानमधील शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांना वाटले ‘हिंदुईजम् : धर्म या कलंक’ हे पुस्तक !

राजस्थानमध्ये हिंदुविरोधी काँग्रेसचे सरकार असल्यामुळे अशा हिंदुद्वेषी शिक्षिकेची चौकशी होऊन तिला शिक्षा होईल का ?, हा प्रश्‍नच आहे ! असे शिक्षक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवणार ?

सिद्धलिंग स्वामीजी यांच्यासह प्रमोद मुतालिक आणि महिला हिंदुत्वनिष्ठ यांना ३ मार्चपर्यंत कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेशबंदी !

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले की, ‘कलबुर्गी जिल्हा प्रशासनाची भूमिका हिंदुविरोधी आहे.

बनारस हिंदु विद्यापिठाच्या प्राध्यापकाकडून देवतांचा अवमान !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचाच हा परिणाम आहे ! असे प्राध्यापक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहेत ?

कर्जत तालुक्यातील धार्मिक स्थळाची विटंबना !

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते. घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ग्रामस्थ येथील महात्मा फुले चौकात एकत्र आले आणि त्यांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईतील कार्यक्रम रहित न केल्यास आंदोलनाची चेतावणी !

सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा १ जानेवारी या दिवशी मुंबईमध्ये होणारा ‘धंदो’ नावाच्या कार्यक्रमाला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

‘स्टँड अप कॉमेडी’ (एकपात्री विनोदी कार्यक्रम)च्या माध्यमातून हिंदु देवतांचा होणारा अवमान रोखला गेला पाहिजे ! – अधिवक्त्या मणि मित्तल, सर्वोच्च न्यायालय

मुनव्वर फारुकी अशा साखळीचा हिस्सा आहे, ज्याचा आरंभ एम्.एफ्. हुसेनपासून झाली होती.