हिंदूंच्या देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या लक्ष्मणपुरी येथील उमर अब्दुल्ला याला अटक !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील गुडंबा पोलिसांनी हिंदूंच्या देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या २१ वर्षीय उमर अब्दुल्ला याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल्ला याने देवतांचे विडंबन करणारा एक व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला होता. त्यातून समाजात तेढ निर्माण करण्याचा त्याचा उद्देश होता, असेही पोलिसांनी सांगितले. अब्दुल्ला याने त्याला विरोध करणार्‍या हिंदूंना शिवीगाळ करत मारहाणही केल्याने त्याला अटक करण्यात आली. व्हिडिओत नेमके काय आक्षेपार्ह होते, हे अद्याप समजू शकलेले नाही.

संपादकीय भुमिका

मुसलमानांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अनादर करणे, हा आता नित्यक्रम झाला आहे. ‘सरकार अशांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई केव्हा करील ?’, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच आहे !