सामाजिक माध्यमांतून विरोध करत अटक करण्याची मागणी
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
नवी देहली – ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाच्या महिला पत्रकार आरफा खानुम शेरवानी यांनी एका व्यंगचित्राद्वारे भगवान श्रीकृष्णाचा अवमान केला आहे. या व्यंगचित्रात एका दलित तरुणाला झाडाला उलटे टांगले आहे. तो पुस्तक वाचत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या हातात तलवार असून तो या तरुणाला विचारतो, ‘तू तोच दलित आहेस ना जो ‘पी.एच्डी’चा अभ्यास करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात टाकत आहेस ?’ हे व्यंगचित्र हैदराबाद विश्वविद्यालयाशी निगडित आहे. ‘हैदराबाद विश्वविद्यालय व्हीआयपी तक्रारीवर कशी प्रतिक्रीया देत आहे’, असे यात लिहिले आहे. हे नेमके काय प्रकरण आहे, हे समजू शकलेले नाही. व्यंगचित्राचा सामाजिक माध्यमातून विरोध होत आहे. ‘आरफा यांना अटक करा’, अशी मागणी उत्तरप्रदेश पोलिसांकडे केली जात आहे.
संपादकिय भुमिका
महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्यांना ठार करण्याचे फतवे काढले जातात; मात्र हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर साधा गुन्हाही नोंद होत नाही. केंद्र सरकारने हिंदूच्या देवतांचा अवमान करणार्यांवर पोलिसांकडून स्वतःहून कारवाई करण्याचा आणि कठोर शिक्षा करण्याचा कायदा बनवून अशा घटना रोखाव्यात, असेच हिंदूंना वाटते !