पंजाबमध्ये शीख तरुणाने भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मूर्तींवर ठेवली चप्पल !

सध्याचा शीख समाज हा ‘शीख’ हा वेगळा धर्म मानतो; मात्र वास्तवात तो हिंदु धर्माचाच एक भाग आहे. भारतात खलिस्तानवाद फोफावू लागल्यानंतर शिखांकडून हिंदूंचा दुःस्वास करणे, त्यांच्या श्रद्धास्थानांवर आघात करणे, असले प्रकार वाढू लागले आहेत. शिखांचा होत असलेला हा बुद्धीभेद थांबवून त्यांना सत्य इतिहास सांगण्यासाठी आता सरकारी आणि सामाजिक स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक ! – संपादक

गुरुदासपूर (पंजाब) – पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये एका शीख तरुणाने भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मूर्तींवर चप्पल ठेवल्याने तेथे उपस्थित हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली.

गुरुदासपूरच्या दोरंगला भागात तेथील बाजार समितीने दुर्गाष्टमीच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी ही घटना घडली. शीख तरुणाने देवतांच्या मूर्तींची विटंबना केल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी पोचण्यास १ घंटा विलंब केला. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेतले. ‘पोलिसांनी दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप बाजार समितीने केला; मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला