हदगाव (जिल्हा नांदेड) येथे हिंदु मंदिर आणि देवता यांच्या विटंबनेप्रकरणी १५ धर्मांधांवर गुन्हे नोंद !

 

नांदेड – जिल्ह्यातील हदगाव शहरातील जिनिंग परिसरात हिंदु मंदिर, तसेच देवतांची विटंबना करत हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी श्री. गोविंद कळसे यांच्या तक्रारीवरून खुदबेनगर येथील १५ धर्मांधांवर हदगाव पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. (अशा घटनांचा निषेध करावा तेवढा थोडाच ! हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करून हिंदूंच्या मनातील त्यांचे स्थान डळमळीत करण्याच्या या षड्यंत्राचा वैचारिक निषेध नोंदवून ते उधळून लावा ! – संपादक)

१. हदगाव येथील आरान अब्दुला, ओसामा शेख, रेहान अलीम, रेहान मेहबूब, शेख मुमताज, शेख मुनुवर आणि इतर मिळून १० जणांनी खुदबेनगर येथील मारुति मंदिरासमोरील भगव्या पताका फाडून टाकल्या. मंदिरासमोरील महादेव पिंडीजवळ विविध प्रकारच्या विटा आणि दगडही आढळून आले.

 

२. १५ धर्मांधांनी हिंदूंच्या देवतांची विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम २९५ आणि ३४ अन्वये त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील दक्षता म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण साहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले करत आहेत. (नुसत्या घटनास्थळांची पहाणी करण्यापेक्षा पोलीस अधिकारी या प्रकरणातील सर्व धर्मांधांना त्वरित अटक का करत नाहीत ? – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • अन्य धर्मियांच्या संदर्भात अशी विटंबना करण्याचे धाडस कुणीच का करत नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे !

  • इस्लामी राष्ट्रांत जर कुणी महंमद पैगंबर किंवा कुराण यांचा अवमान केला, तर त्याला थेट मृत्यूदंडाची शिक्षा केली जाते. याउलट हिंदूबहुल; पण ‘निधर्मी’ भारतात कुणीही ऊठसूठ हिंदूंच्या देवतांची मूर्ती फोडतो, हिंदूंचे धर्मग्रंथ जाळतो, देवतांची टिंगळटवाळी करतो. अशा गोष्टींवर बंदी घालण्याची मागणी करण्याची वेळ हिंदूंवर येते, हे दुर्दैवी आहे. यावरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !