वृत्तपत्रांतील देवतांच्या चित्रांवरील निर्बंधांची मागणी न्यायालयाने फेटाळली !

मुंबई – सण-उत्सवांच्या काळात वृत्तपत्रात छापून येणारी देवतांची चित्रे दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या कडेला किंवा कचऱ्याच्या डब्यात आढळून येतात. वृत्तपत्रांमध्ये देवीदेवतांची चित्रे छापण्यावर बंदी घालण्यात यावी, या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. अधिवक्ता फिरोज बाबूलाल सय्यद यांच्याद्वारे अधिवक्ता प्रीतेश बोहाडे यांनी याचिका प्रविष्ट केली होती. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही.जी. बिष्ट यांच्या खंडपिठासमोर २ मे या दिवशी या याचिकेवर सुनावणी झाली.