वडोदरा (गुजरात) येथील सयाजीराव विश्‍वविद्यालयातील प्रदर्शनामध्ये हिंदूंच्या देवतांचा अवमान

अभाविप आणि रा.स्व. संघ यांच्याकडून अधिष्ठातांच्या त्यागपत्राची मागणी

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

वडोदरा (गुजरात) – येथील महाराजा सयाजीराव विश्‍वविद्यालयामधील ‘फाइन आर्ट्स’च्या संदर्भातील एका प्रदर्शनामध्ये काही विद्यार्थ्यांनी लावलेल्या चित्रांतून हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्यात आला आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी अधिष्ठातांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे.


या चित्रांमध्ये हिंदूंच्या देवतांना आणि काही राष्ट्रीय चिन्हांना बलात्कारांच्या घटनांशी जोडलेले दाखवण्यात आले आहे. देवतांची चित्रे बनवण्यासाठी वर्तमानपत्रांच्या कागदांचा वापर करण्यात आला. ज्या कागदांचा वापर करण्यात आला, त्यातील बहुतेक कागदांवर बलात्काराच्या घटनांच्या बातम्या होत्या.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना आता कठोर शिक्षा होणारा कायदा करणेच आवश्यक झाले आहे, तरच अशा घटना कायमच्या थांबतील !