महाराष्ट्र दिनापासून राज्यातील बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी एस्.टी. महामंडळ विशेष मोहीम राबवणार !

अस्वच्छ बसस्थानकांची छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि दैनिक ‘सनातन प्रभात’साठी या ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सअप’ क्रमांकावर पाठवा.

मुंबई विद्यापिठातील मुलींच्या वसतीगृहात ८ मासांपासून पाणीच नाही !

मुलींच्या वसतीगृहात पाण्याची कमतरता असेल, तर पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. (८ मासांनंतर असे निर्देश देणार्‍या विद्यापीठ प्रशासनाचा गलथान कारभार !)

गोवा : टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरून काँग्रेसकडून जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांना घेराव

लोकांच्या आरोग्याशी खेळ ! गोव्यात पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे टँकर मलनिस्सारणासाठी वापरले जातात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे, अशी भूमिका घेऊन काँग्रेसचा जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्याना घेराव !

धर्मादाय रुग्‍णालयांतील गरिबांसाठीच्‍या राखीव खाटांची माहिती ‘अ‍ॅप’द्वारे मिळणार !

धर्मादाय रुग्‍णालयांमध्‍ये निर्धन आणि आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्‍या जागांपैकी किती खाटा शिल्लक आहेत ?यासाठीचा ‘अ‍ॅप’ प्राधान्‍यक्रमाने सिद्ध करण्‍याचा आदेश आरोग्‍यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिला आहे.

नागपूर येथील एन्.सी.आय. म्‍हणजे मध्‍य भारतातील कर्करोगाच्‍या उपचाराचे आरोग्‍य मंदिर ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कॅन्‍सर इन्‍स्‍टिट्यूट’मुळे (एन्.सी.आय.) कर्करोगासारख्‍या दुर्धर व्‍याधीने ग्रस्‍त रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे. ही संस्‍था विदर्भासह मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या मध्‍य भारतातील राज्‍यांसाठी आरोग्‍य मंदिर ठरत आहे.असे ते म्‍हणाले.

अवैध पद्धतीने कृत्रिमरित्‍या आंबे पिकवणार्‍यांवर अन्‍न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई !

अवैध पद्धतीने कृत्रिमरीत्‍या आंबे पिकवणार्‍या मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या व्‍यापार्‍यांवर अन्‍न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई सहआयुक्‍त (अन्‍न) सुरेश देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली साहाय्‍यक आयुक्‍त योगेश ढाणे, गौरव जगताप यांच्‍या पथकाने केली आहे.

वास्को येथे भटक्या कुत्र्यांनी महिलेच्या डोक्यासह शरिराला चावे घेतले

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. कुत्र्यांच्या उपद्रवावर शासनाने कठोरतेने पावले उचलणे आवश्यक आहे.श्वानप्रेमी संघटनांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

‘पर्यावरण असमतोल’ कुणामुळे ?

तापमान वाढीला ‘आधुनिक जीवनशैली’ कारणीभूत आहे आणि ती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने यात लक्ष घालून समाजाचे प्रबोधन करणेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा मानवाची विनाशाकडे वाटचाल होईल हे नक्की !  

निरोगी जीवनासाठी जेवणाचे १० नियम !

आज आपण भोजनाच्या संबंधी आयुर्वेदामध्ये सांगितलेले नियम शिकून घेणार आहोत. या नियमांचे पालन केले, तर आपण निश्चितच निरोगी राहू शकतो.

सडक्‍या सफरचंदांच्‍या वापरातून सिद्ध केलेल्‍या रसाची विक्री !

नवी मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये व्‍यापार्‍यांनी फेकून दिलेल्‍या सडक्‍या सफरचंदांचा रस करून तो विकण्‍यात येत आहे. हे एका व्‍हिडिओद्वारे उघड झाले.