
रायगड – प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. रायगड जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने ४३ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. तेथे सहस्रो जिज्ञासूंनी भेट दिली.
शिवसेना कामोठे शहर प्रमुख श्री. सुनील गोवारी यांनी कामोठे येथील ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.


