हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनातून कुंभपर्वातील भाविकांना उत्तम मार्गदर्शन मिळत आहे ! – जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणफलक प्रदर्शनातून कुंभपर्वात आलेल्या भाविकांना उत्तम मार्गदर्शन मिळत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हे प्रदर्शन पुष्कळ छान बनवले आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य लवकर पूर्ण व्हावे ! – स्वामी डॉ. योगानंदगिरी महाराज

हिंदु जनजागृती समिती तिच्या कार्यात अग्रेसर रहावी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य लवकर पूर्ण व्हावे, असे प्रतिपादन विश्‍वसेना संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी डॉ. योगानंदगिरी महाराज यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

देशात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होणे, हा चिंतेचा विषय आहे ! – महंत श्री सोमेश्‍वरगिरी श्रीमंत रामानंदगिरी महाराज

देशात लव्ह जिहादच्या घटना वाढत आहेत, हा चिंताजनक विषय आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे महंत श्री सोमेश्‍वरगिरी श्रीमंत रामानंदगिरी महाराज यांनी नुकतेच येथे केले.

धर्माचे शाश्‍वत रक्षण केल्यानंतर धर्म आणि कार्य यशस्वी होते ! – पंडित कैलाशचंद शर्मा, बुलंद, उत्तरप्रदेश

सनातनच्या प्रदर्शनस्थळी येऊन मला फार चांगले वाटले. धर्मकार्याशिवाय आणखी दुसरे चांगले कार्य असू शकत नाही. धर्म वाचवण्यासाठी केल्या जाणार्‍या कार्यापेक्षा मोठे धर्मकार्य होऊ शकत नाही. आपण यज्ञ, पूजा, पाठ यांसह इतर धार्मिक कार्य करत असतो

परात्पर गुरु डॉ. आठवले मोठे धर्मकार्य करून लोकांना धर्माची शिकवण देत आहेत ! – पू. कात्यायनीदेवी

ज्या वेळी अधर्म माजतो, त्या वेळी ईश्‍वर अवतार घेऊन धर्म आणि साधू यांच्या रक्षणासाठी प्रत्येक युगात येत असतो. माणूस धर्मापासून दूर जात आहे. असे न होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीप्रमाणे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास राष्ट्राला चांगले दिवस येतील ! – साध्वी जय जगतगौरी मनसा, त्रिपुरा

हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणाविषयी लावलेले हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. या देशात गायींची हत्या थांबलीच पाहिजे. अशा प्रकारे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास आपला समाज, धर्म आणि राष्ट्र यांना चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन नागमाता सेवाश्रमाच्या साध्वी जय जगतगौरी मनसा यांनी केले.

ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फलक यांचे प्रदर्शन

येेथील खंडवा रोडवरील श्री गणपति मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

सनातन संस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे ! – श्री रमेशगिरी महाराज, जनार्दन आश्रम, कोपरगाव

सनातन संस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे, हे प्रदर्शन पाहिल्यानंतर लक्षात येते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती होईल, अशी मी अपेक्षा करतो, असे प्रतिपादन कोपरगाव (महाराष्ट्र) येथील जनार्दन आश्रमाचे श्री रमेशगिरी महाराज यांनी केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याप्रमाणे सर्व संतांनी कार्य करायला हवे ! – स्वामी भास्करतीर्थ महाराज, महामंत्री, अखिल भारतीय संत समिती, ओडिशा

माता गंगा नदीच्या किनारी हिंदूंचे रक्षण आणि जागृती यांसाठी हे प्रदर्शन लावले आहे. अनेक संकटे आली, तरी तुम्ही हिंदु धर्माची परंपरा आणि हिंदू यांच्यासाठी कार्य करत आहात. सर्व संतांनी असे कार्य करायला हवे.

अक्कलकोट येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५५ व्या अधिवेशनाला प्रारंभ !

येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ५५ वे आणि सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे ४१ वे अधिवेशन २ आणि ३ फेब्रुवारी या कालावधीत श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक कॉलेज येथे चालू आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now