ग्रंथप्रदर्शनाला भाविकांचा भरघोस प्रतिसाद

सोलापूर – सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो शिवभक्त आणि मान्यवर यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध डॉ. अतुल वेलणकर आणि डॉ. अबोली वेलणकर यांच्या हस्ते कऱण्यात आले. या प्रदर्शनाला भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली, तसेच सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. अंशू शर्मा, ‘ज्येष्ठ नागरिक संघटने’चे अध्यक्ष श्री. घनश्याम दायमा, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक राजकुमार पाटील, माजी नगरसेवक नागेश भोगडे, माजी महापौर सौ. शोभा बनशेट्टी, श्री. उदजयशंकर चाकोते इत्यादी उपस्थित होते.

खालील ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
१. मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस २. निळकंठेश्वर मंदिर, कन्ना चौक ३. ओंकारेश्वर मंदिर, आय ग्रुप, जुना घरकुल ४. मल्लिकाजुन मंदिर, शेळगी ५. मल्लय्या मंदिर, सिद्धरामेश्वरनगर, एम्.आय.डी.सी. सोलापूर ६. विरतपस्वी मंदिर, अक्कलकोट रोड, सोलापूर ७. महादेव मंदिर उत्कर्षनगर, सोलापूर ८. शिवमंदिर, विजयनगर, नवीन घरकुल रोड, सोलापूर.