
मुंबई
घाटकोपर असल्फा येथील श्री जंगलेश्वर मंदिर येथे लावलेल्या कक्षाला चांदिवली मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. दिलीप लांडे यांनी भेट दिली.
ठाणे
ठाणे येथे १६, दिवा येथे १, डोंबिवली येथे ९, कल्याण आणि बदलापूर येथे प्रत्येकी २, मुरबाड अन् अंबरनाथ येथे प्रत्येकी १ अशा ठिकाणी ग्रंथप्रदर्शन अन् विक्री केंद्र उभारण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. येथील कक्षांना विविध मान्यवरांनी भेट दिली.
नवी मुंबई
नवी मुंबई येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. वाशी येथील श्री बुद्धेश्वर मंदिर येथे भजन, कीर्तन, अभिषेक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तुर्भे येथील शिवमंदिर प्रतिष्ठानच्या वतीने कीर्तन, हरिपाठ, भजन, अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
श्री सोमेश्वर शिवमंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वाशीतील एम्.जी. कॉम्प्लेक्स येथे महाशिवरात्रीच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ५ वाजता शिवलिंग महाभिषेक सोहळा, शिवरूद्रयाग यज्ञ आणि दर्शन सोहळा, सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाआरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिर, सायंकाळी ६ नंतर महाप्रसाद (भंडारा) झाला. या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक आदी उपस्थित होते.
अमळनेर (जिल्हा जळगाव)
येथील कपिलेश्वर महादेव मंदिर येथे जळगावच्या भाजपच्या खासदार सौ. स्मिता वाघ यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. शिवोपासना नेमकी कशी करायची, याची माहिती देणारे विविध आध्यात्मिक ग्रंथ आणि साहित्य याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भेट देण्यात आला.




