सनातनचे साधक अनमोल करमळकर यांच्या विवाहाच्या निमित्ताने अध्यात्मप्रसार !

कोल्हापूर, १ मार्च (वार्ता.) – येथील सनातनचे साधक श्री. अनमोल अरुण करमळकर आणि सौ. अवनी (पुर्वाश्रमीची कु. श्रेया गुब्याड) यांचा विवाह २५ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे पार पडला. या निमित्ताने आलेले पाहुणे, नातेवाईक, मित्र, समाजातील लोक यांना अध्यात्मप्रसाराचा लाभ होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक ग्रंथ आणि उत्पादने यांचा कक्ष लावण्यात आला. याप्रसंगी धर्मशिक्षणविषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. ‘धर्मशिक्षणविषयक फलकांमुळे आजपर्यंत माहिती नसलेली माहिती मिळाली’, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. आलेल्या पाहुण्यांनी धर्मकार्यासाठी अर्पण दिले.

विवाह सोहळ्याच्या निमित्ताने लावण्यात आलेले प्रदर्शन पहातांना नागरिक

विवाहाच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाचे वितरण करण्यात आले. विवाहाच्या निमित्ताने अध्यात्मप्रसार करून डॉ. अरुण करमळकर, सौ. अनिता करमळकर (श्री. अनमोल यांचे आई-वडील) कुटुंबियांनी सर्वांसमोर आदर्शच ठेवला.

विवाहाच्या निमित्ताने लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन

सुंदर विवाहसोहळा अनुभवला आणि विधींचे महत्त्व लक्षात आले ! – विवाहासाठी आलेल्या नातेवाइकांची प्रतिक्रिया

विवाहासाठी आलेल्या नातेवाइकांनी ‘या निमित्ताने आम्ही सुंदर विवाहसोहळा पहिल्यांदाच अनुभवला’, असे सांगितले. विधी करण्यासाठी साधक पुरोहित असल्यामुळे सर्व विधी शांत वातावरणात आणि भावपूर्ण झाले. सभागृहात पुष्कळ शांत वातावरण होते, असेही नातेवाइकांनी सांगितले. सोहळा झाल्यावर एक वाचक श्री. आनंद माने म्हणाले, ‘‘मला हा विवाह सोहळा दैवी वाटला. हा सोहळा अयोध्येत चालू असून श्रीराम आणि सीता यांचे अस्तित्व जाणवत होते.’’