
मथुरा (उत्तरप्रदेश) – महाशिवरात्रीनिमित्त २६ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने श्री भूतेश्वर महादेव मंदिर आणि श्री गर्तेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आध्यात्मिक ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. या दोन्ही प्रदर्शनांना भाविक आणि जिज्ञासू यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक जिज्ञासूंनी सनातन संस्थेने आयोजित केलेल्या सत्संगात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.