श्रीक्षेत्र आळंदीसह सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांचा परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करा ! – आळंदी येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी

वारकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी ९ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे १७ व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.

Goa Mandir Parishad : मंदिर परिषदेला बार्देश, पेडणे आणि डिचोली येथून १५० हून अधिक मंदिरांचे विश्‍वस्त सहभागी होणार

या परिषदेत मंदिरांच्या समस्या, पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी आदी प्रश्‍नांवर ऊहापोह होऊन त्यावर पुढील ध्येयधोरण निश्‍चित केले जाणार !

श्री तुळजाभवानीदेवीचा सोन्याचा मुकुट गायब, तर प्राचीन दागिन्यांच्या वजनात तफावत !

मंदिरातील हा अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी मंदिर सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !

गाव तेथे मंदिर महासंघाची शाखा निर्माण व्हावी ! – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

पंढरपूर येथील मंदिरात ‘पैसे’ देऊन श्री विठ्ठलाचे दर्शन आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर समितीला लागू करू दिले नाही. त्यासाठी लढा दिला. मंदिर समितीने भजन बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यालाही आम्ही विरोध करून तो निर्णय मागे घेण्यास भाग पडले.

मंदिरांवर आधारित हिंदूंची अद्भुत दैवी अर्थव्यवस्था !

भारतात आधीपासून एक महत्त्वाची व्यवस्था कार्यरत होती, ती म्हणजे मंदिर आधारित अर्थव्यवस्था किंवा मंदिरांवर आधारित संस्कृतीची व्यवस्था ! ही व्यवस्था आताही आहे. केवळ त्या दृष्टीने त्याची ओळख नाही.

जन्महिंदूंचे कर्महिंदूंत रूपांतर करण्याचे कार्य मंदिरांच्या माध्यमातूनच शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

ओझर (पुणे) येथे चालू असलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेतील संत आणि मान्यवर यांचे विचारधन ! ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – प्राचीन काळापासून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे आहेत. धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे आपल्याकडे विविध शासकांनीही मंदिरे उभारली. मंदिर संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्व प्रकारची साहाय्यता केली. … Read more

शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्मरक्षणाचा प्रण घ्या ! – महंत सुधीरदासजी महाराज, काळाराम मंदिर, नाशिक

ओझर (पुणे) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेला प्रारंभ ! मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राज्यभरातील ५५० हून अधिक विश्‍वस्त एकवटले ! ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी संघर्ष करा. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. त्यांनी आपल्याला धर्मासाठी झुंजण्याची वृत्ती दिली. ८ लाखांचे सैन्य घेऊन महाराष्ट्रात शिरलेल्या औरंगजेबाला … Read more

श्रीकृष्णाविषयी श्रद्धा आणि भक्ती वाढवणारा विद्वत्तापूर्ण ग्रंथ : ‘योगेश्‍वर श्रीकृष्ण’ ! – – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पुणे जिल्ह्यातील ओझर येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर परिषदेत श्रीकृष्ण यांचे जीवन आणि शिकवण यांतील वैशिष्ट्यपूर्ण पैलू उलगडणारे ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर लिखित ‘योगेश्‍वर श्रीकृष्ण’ या ग्रंथाचे प्रकाशन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते झाले.

हिंदु धर्माचे प्राण असलेल्या मंदिरांना जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे, हेच प्रत्येक हिंदूचे प्रथम कर्तव्य !

हिंदूंची मंदिरे आणि त्यांच्या परंपरा जपण्यासाठी हिंदूंसह मंदिर विश्वस्तांचे संघटन करणे, हे काळानुसार धर्माचरणच आहे. असे करायचे असेल, तर हिंदूंच्या मंदिर विश्वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.

Goa State Mandir Parishad : म्हार्दोळ येथे १० डिसेंबर या दिवशी होणार्‍या राज्यस्तरीय मंदिर परिषदेच्या प्रचाराला गती !

मंदिरांचे सुव्यवस्थापन करणे आणि मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे या हेतूने या मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला गोव्यातील समस्त मंदिरांचे विश्वस्त आणि पुरोहित सहभागी होणार आहेत.