नवी देहली – देशात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ७ रुपयांची कपात करण्यात आली आहे; मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही पालट झालेला नाही. १ ऑगस्ट २०२४ पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही पालट करण्यात आलेला नाही.
देहलीमध्ये आता १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत १ सहस्र ७९७ रुपये झाली आहे. पूर्वी ती १ सहस्र ८०४ रुपये होती. मुंबईत हा गॅस सिलिंडर १ सहस्र ७४९ रुपये ५० पैशांनी उपलब्ध आहे.