व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट !

नवी देहली – व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरामध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. ‘इंडियन ऑइल’ने घोषित केलेल्या किंमतीनुसार राजधानी देहलीत १९ किलो वजनाच्या सिलिंडरच्या किंमतीत १९८ रुपयांची घट झाली आहे.

राजधानीत आधी याची किंमत २ सहस्र २१९ रुपये होती, ती आता २ सहस्र २१ रुपये झाली आहे.