भोपाळ येथील रुग्णालयातील बालकांच्या कक्षाला लागलेल्या आगीत ४ मुलांचा मृत्यू

सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता

कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या कक्षाला आग

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या कक्षाला आग लागल्याने ४ मुलांचा मृत्यू झाला. या कक्षातून ३६ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

आग लागल्यानंतर रुग्णांना ‘स्ट्रेचर’वरून बाहेर काढण्यात येत होते. या वेळी रुग्णांच्या कुटुंबियांना आत प्रवेश दिला जात नव्हता. स्वतःच्या मुलांचा शोध घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचा गोंधळ उडाला होता.