‘उगवत्या सूर्या’तील भारत !

योग्य संधी साधून पंतप्रधान मोदी यांनीही सुगा यांचे याविषयी कौतुक करून त्यांना अन् त्यांच्या खासदारांना यंदाचा गणेशोत्सव पहाण्यासाठी भारतात आमंत्रित केले. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे भारतात वहात असून भारताबाहेरही अशा प्रकारे त्याचे पडसाद उमटत आहेत, हे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी !

पंतप्रधान मोदी यांनी जापानचे माजी पंतप्रधान आणि त्यांच्या ‘गणेश ग्रूप’च्या खासदारांची घेतली भेट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी जापानच्या दौर्‍यावर आहेत. मोदी यांनी जापानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि त्यांच्या ‘गणेश ग्रुप’ नावाच्या खासदारांच्या गटाला भारतात यंदा होणार्‍या गणेशोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण २८ एप्रिलपासून चालू होणार

कोकण रेल्वेच्या ‘गणपति विशेष गाड्यां’चे आरक्षण १२० दिवस अर्थात ४ मास आधीपासून म्हणजे २८ एप्रिलपासून चालू होत आहे.

(म्हणे) ‘गणेशोत्सवातील ‘डीजे’मुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का ?’ – आमदार अबू आझमी

मशिदींवरील भोंगे काढण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांना ते अद्याप का काढले गेले नाहीत ? त्यासाठी आझमी यांनी आजपर्यंत काय प्रयत्न केले ? या प्रश्नांची उत्तरे ते देतील का ?

पीओपींच्या मूर्तीविषयी ‘सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ची मुंबई महापालिकेसह बैठक पार पडली !

या बैठकीत प्लास्टर ऑफ पॅरीस मूर्तींविषयी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या सूचना (गाईडलाईन्स) दिल्या आहेत, त्यावर चर्चा झाली.

दिवाळीमध्ये दुपटीहून अधिक तिकीटदर आकारून महाराष्ट्रात खासगी ‘ट्रॅव्हल्स’कडून प्रवाशांची आर्थिक लूट !

अशी लूट अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी झाली असती, तर प्रशासनाने असाच निष्काळजीपणा दाखवला असता का ? सरकारने यात लक्ष घालून असे अपप्रकार चालू देणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे !

भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने १६ ऑक्टोबरला विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण ! – गोवर्धन हसबनीस, भाजप सांस्कृतिक आघाडी 

भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने दळणवळण बंदीच्या काळात सांगली जिल्ह्यात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, तसेच गणेशोत्सव काळात गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

निर्दाेष मुक्तता करतांना १२ वर्षे अपकीर्ती करणार्‍यांना १२ वर्षे कारागृहात टाका आणि त्यांच्याकडून मानहानीचा दंडही घेऊन निरपराध्यांना द्या !

मिरज शहरात गणेशोत्सवाच्या कालावधीत वर्ष २००९ मध्ये जातीय दंगल उसळली होती. सांगली येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचा खटला चालू होता. हा खटला विसर्जित करण्यात यावा, या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून २ मासांपूर्वी न्यायालयात आवेदन प्रविष्ट करण्यात आले होते.

गणेशोत्सवाच्या काळात पूजेसंबंधी सेवांच्या मागणीत ७२ टक्‍क्‍यांनी वाढ !

मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्बंध लादले होते. त्यामुळे उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदा मागील वर्षीच्या तुलनेने बंधने अल्प असल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पूजेसंबंधी सेवांच्या मागणीत ७२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली.

मिरज दंगल प्रकरणात सरकारकडून खटला मागे घेतल्याने १०६ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !

मिरज शहरात गणेशोत्सव कालावधीत वर्ष २००९ मध्ये जातीय दंगल उसळली होती. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे नोंद झाले होते. सांगली येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचा खटला चालू होता.