कोरोना महामारीच्या काळात गणेशोत्सवावर घातलेले निर्बंध राज्यशासनाने हटवले !

कोरोना महामारीच्या काळातील निर्बंधांमुळे सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या; पण आता सण साजरे करण्यावरील निर्बंध मागे हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी सर्वच सण धूमधडाक्यात साजरे होतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.

श्री गणेशोत्सवाविषयी शास्त्र सांगणारी ४ भित्तीपत्रके उपलब्ध !

श्री गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना धर्मशिक्षण देणे आणि समाजप्रबोधन करणे या उद्देशांनी पुढील १.५ फूट × २ फूट आकारातील भित्तीपत्रके नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहेत. या भित्तीपत्रकांसाठी प्रायोजक मिळवून त्यांचा प्रसारासाठी सुयोग्य वापर करावा.

गणेशोत्सवानिमित्त रोहा-चिपळूण १२ डब्यांची ‘मेमू’ !

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने रोहा-चिपळूण ‘मेमू’ गाडी चालवण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या गाडीचे रोहा ते चिपळूण केवळ ९० रुपये तिकीट आहे.

गुजरातमध्ये गणेशमूर्तींच्या उंचीवरील निर्बंध रहित !

वर्ष २०२१ मधील कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्स्व मंडळांच्या गणेशमूर्तींची उंची ४ फूट आणि घरगुती गणेशमूर्ती २ फूटांहून अधिक असू नये, असे निर्बंध घालण्यात आले होते.

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वरील बंदी !

प्रदूषण गणेशोत्सवामुळे होते कि शासकीय अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा किंवा भ्रष्टता यांमुळे होते ? ते लक्षात येते. शाडू मातीच्या मूर्तींचा पर्यायही उपलब्ध करून द्यायचा नाही आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरही बंदी आणायची अन् असे करून हिंदूंना कोंडीत पकडायचे, हा हिंदूंच्या गणेशोत्सवावर केलेला मोठा आघातच नव्हे का ?

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवणाऱ्या कामगारांना सातारा नगरपालिकेची नोटीस !

आगामी गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवणाऱ्या कामगारांना नोटीस पाठवली आहे.

 ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वरील बंदी योग्यच !

‘पीओपी’च्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होत असल्याच्या कारणावरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्ष २०१० मध्ये ‘पीओपीचा वापर करू नये’, याविषयी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली होती.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती उत्पादनावर बंदी !

प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालत असतांना प्रशासनाने मूर्तीकारांना शाडूमाती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे !

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांसाठी मूर्ती पर्यावरणपूरक शाडू मातीच्याच असाव्यात !

‘मूर्ती शाडू मातीची असावी’, असे धर्मशास्त्र सांगते. हिंदु धर्मशास्त्राचे आचरण केल्यास पर्यावरणाला कोणतीही हानी पोचत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेचा पर्यावरणपूरक, तसेच शाडू मातीच्या मूर्तीचा निर्णय निश्चितच अभिनंदनीय !

कोकण रेल्वेच्या गणेशोत्सवासाठीच्या गाड्यांचे आरक्षण पूर्ण !

कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाचा प्रयत्न करताच प्रतीक्षा सूची अधिक झाल्याने रेल्वेने आरक्षण देणेच बंद केले आहे.