भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने १६ ऑक्टोबरला विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण ! – गोवर्धन हसबनीस, भाजप सांस्कृतिक आघाडी 

पत्रकार परिषदेत माहिती देतांना डावीकडून श्री. गोवर्धन हसबनीस, सौ. अपर्णा गोसावी आणि श्री. सचिन पारेख

सांगली, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने दळणवळण बंदीच्या काळात सांगली जिल्ह्यात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, तसेच गणेशोत्सव काळात गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम १६ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता विश्रामबाग येथील ‘खरे सांस्कृतिक भवन’ येथे होणार आहे, अशी माहिती भाजप सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष श्री. गोवर्धन हसबनीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष सौ. अपर्णा गोवासी, कोषाध्यक्ष श्री. सचिन पारेख उपस्थित होते.