सिंधुदुर्गनगरी – प्रतिवर्षी शहरांतील नोकरदारवर्ग कोकणातील गणेशोत्सवाला जाण्यासाठी पूर्वसिद्धता करत असतो. सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्याही न्यून झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी गणेशोत्सव नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा होण्याची शक्यता आहे. ३१ ऑगस्ट २०२२ या दिवशी गणेशोत्सवाला आरंभ होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या ‘गणपति विशेष गाड्यां’चे आरक्षण १२० दिवस अर्थात ४ मास आधीपासून म्हणजे २८ एप्रिलपासून चालू होत आहे.
Ganesh Utsav Train Booking _ गणेशोत्सवासाठी रेल्वेचं तिकीट बुकिंग एप्रिल अखेरीस सुरु होणार#GaneshUtsav #IndianRailway #Maharashtra #Ganeshfestival2022 #ABPMajha pic.twitter.com/wRBL9Ehm7H
— ABP माझा (@abpmajhatv) April 11, 2022