पंतप्रधान मोदी यांनी जापानचे माजी पंतप्रधान आणि त्यांच्या ‘गणेश ग्रूप’च्या खासदारांची घेतली भेट !

डावीकडून जापानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि पंतप्रधान नरेद्र मोदी

टोकियो – पंतप्रधान नरेंद्र मोदी जापानच्या दौर्‍यावर आहेत. मोदी यांनी जापानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि त्यांच्या ‘गणेश ग्रुप’ नावाच्या खासदारांच्या गटाला भारतात यंदा होणार्‍या गणेशोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. सुगा हे सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत जपानचे पंतप्रधान राहिले होते. वर्ष २०१९ मध्ये जेव्हा माजी पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी पंतप्रधानपदाचे अचानक त्यागपत्र दिले, तेव्हा सुगा यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले होते.

सुगा समर्थक असलेल्या ‘गणेश ग्रुप’ची स्थापना वर्ष २०१५ मध्ये झाली होती. सुगा यांना १० खासदारांचा समावेश असलेल्या ‘रेवा ग्रुप’चाही पाठिंबा आहे. सुगा यांना ३० ते ४० खासदारांचे  समर्थन असून या गटाला ‘सुगा ग्रुप’ असे संबोधले जाते.