प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे अन्य अवशेष नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी मसुदा अधिसूचित, नागरिकांकडून हरकती मागवल्या
पणजी, ११ फेब्रुवारी (वार्ता.) : गोवा सरकारने प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे अन्य अवशेष नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी मसुदा अधिसूचित केला आहे. यामध्ये दंडात्मक कारवाईच्या प्रावधानासाठी नागरिकांकडून ३० दिवसांच्या आत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.
मसुद्यानुसार सरकारच्या मालकीची संरक्षित स्मारके आणि स्थळे यांचे आवश्यक ते शुल्क भरून अधिकृतरित्या अनुमती न घेता चित्रीकरण करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सरकारच्या मालकीची संरक्षित स्मारके आणि स्थळे या ठिकाणी विनापरवाना चित्रीकरण केल्यास ५० सहस्र रुपये दंड आणि इतर संरक्षित स्मारकांचे विनापरवाना चित्रीकरण केल्यास २० सहस्र रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सरकारच्या मालकीची संरक्षित स्मारके आणि स्थळे या ठिकाणी चित्रीकरणासाठी प्रतिदिन २५ सहस्र रुपये आणि परत करण्याजोगे १० सहस्र रुपये सुरक्षा ठेव म्हणून आकारले जाणार आहेत. इतर संरक्षित स्मारकांवर चित्रीकरणासाठी प्रतिदिन १० सहस्र रुपये शुल्क आणि २ सहस्र रुपये परत करण्यायोग्य सुरक्षा ठेव आकारली जाणार आहे. या प्रकरणी कोणत्याही प्रावधानाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाणार आहे.
संपादकीय भूमिकासंरक्षित ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या स्थळी गेली काही वर्षे प्रत्येक वर्षी फेस्त (जत्रा) आयोजित केले जाते. त्यासाठी पुरातत्व विभागाची अनुमती घेतली जाते का ? आणि अनुमती असेल, तर त्यासाठी किती शुल्क आकारले जाते ? |