WB Anti-Spitting law : बंगालमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांना १ सहस्र रुपयांचा दंड करणारा कायदा होणार

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये सार्वजनिक ठिकाणी तंबाखू किंवा पान मसाला खाऊन थुंकणार्‍यांना दंड करण्याचे एक विधेयक विधानसभेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाणार आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. शिक्षेची नेमकी रक्कम अद्याप निश्‍चित झालेली नसली, तरी अशा प्रत्येक गुन्ह्यासाठी एकसमान १ सहस्र रुपये दंड आकारला जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बंगालमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यापासून रोखण्याचा कायदा वर्ष २००३ पासून अस्तित्वात आहे. यानुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कमाल २०० रुपये दंड आकारला जातो.

संपादकीय भूमिका

केवळ अशा प्रकारचा कायदा करून उपयोग नाही, तर शाळेपासून या संदर्भात शिक्षण दिले गेले पाहिजे !