‘तमिळगा वेट्री कळघम्’चे जोसेफ विजय यांचा हा क्षण : एका अभिनेत्याच्या विजयापलीकडचे काहीतरी !
भारतीय राजकारणाचे सिनेमाशी नेहमीच एक विलक्षण नाते राहिले आहे. पडद्यावरील पौराणिक देवतांपासून खर्या आयुष्यातील तारणहार नेत्यांपर्यंत पडद्यावरून वास्तवात आलेल्या या स्थित्यंतराने अनेकदा नाट्यमय परिणाम घडवले आहेत; पण क्वचितच टिकाऊ राजकीय यश मिळवले आहे.