(म्हणे) ‘रावण आसुरी वृत्तीचा नव्हता, तोही माणूस होता !’

रावण खलनायक आणि राक्षस होता, हे जगजाहीर असतांना अशा प्रकारचे त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न चित्रपटातून होत असेल, तर आताच हिंदूंनी या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवून तो रहित करण्यास निर्मात्यांना भाग पाडले पाहिजे !

चित्रपटसृष्टीची कथा !

सर्व पहाता चित्रपटसृष्टीची शुद्धी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजाच्या शुद्धीसाठी आणि त्याच्यावर सुसंस्कार करण्यासाठी हे अगत्याचे झाले आहे; कारण चित्रपट हे वैचारिक प्रबोधनाचे एक मोठे माध्यम आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते.

उत्तरप्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराची चित्रपटसृष्टी निर्माण करणार ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे १ सहस्र हेक्टरहून अधिक भूमीवर ही आंतरराष्ट्रीय स्तराची चित्रपटसृष्टी निर्माण करणार, अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

‘मुकुठी अम्मान’ या तमिळ चित्रपटात हिंदु धर्म, देवता आदींचे विडंबन

तमिळ भाषेतील ‘मुकुठी अम्मान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदीतील ‘पीके’ या चित्रपटावर आधारित आहे. ‘पीके’ चित्रपटात हिंदु देवता, गुरु आणि परंपरा यांचे मोठ्या प्रमाणावर विडंबन करण्यात आले होते, तर ‘मुकुठी अम्मान’ या चित्रपटातही असेच विडंबन काही प्रमाणात करण्यात आले आहे.

आतंकवादी संघटनांना अर्थसाहाय्य करणारा पाकिस्तानी कलाकार रेहान सिद्दीकी आणि त्याचे सहकारी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यावर भारताकडून बंदी

राष्ट्रविरोधी कारवाया रोखण्यासाठी आवाज उठवणारे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचे अभिनंदन ! सर्व लोकप्रतिनिधींसाठी खासदार शेवाळे यांची कृती अनुकरणीय आहे !

बॉलिवूडवाल्यांचे पाप !

सध्या बॉलिवूडमधील घराणेशाहीचे सूत्र उपस्थित झाले असून काही नामांकित घराण्यांवर टीकेची झोड उठली आहे. आता त्याही पुढे जाऊन बॉलिवूडमधील कलाकारांचे पाकची कुख्यात गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.शी संबंध असल्याचे आरोप होत आहेत.