१२ वीच्या परीक्षेचा निकाल ८ जून या दिवशी घोषित होणार !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल ८ जून या दिवशी घोषित करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पहाता येणार आहे.

हिजाबबंदीला विरोध करणाऱ्या २४ महाविद्यालयीन विद्यार्थीनी निलंबित

आता अशा विद्यार्थीनींना कुणी कट्टरतावादी का म्हणत नाही ?

शाळेमध्ये शिक्षकांच्या भ्रमणभाष वापरावर निर्बंध !

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील मुलांची गुणवत्ता वाढावी, कोरोना संसर्गाच्या काळातील मुलांची शैक्षणिक हानी भरून काढावी यांसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

महाविद्यालयात हिजाब घालून येणार्‍या ६ मुसलमान विद्यार्थिनी निलंबित !

राज्यशासन आणि न्यायालय यांचा शैक्षणिक संस्थांत हिजाब घालून न येण्याचा आदेश असतांनाही त्याचे उल्लंघन करणार्‍या अशा विद्यार्थिनींना महाविद्यालयातून काढूनच टाकले पाहिजे ! अशा विद्यार्थिनींना कुणी ‘कट्टरतावादी’ का म्हणत नाही ?

ममता बॅनर्जी यांची हुकूमशाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलर आहेत’, अशी ओरड करणारे साम्यवादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयावर मात्र सोयीस्कररित्या मौन बाळवून गप्प आहेत ! ममता बॅनर्जी यांचा हा निर्णय एकप्रकारे शिक्षणक्षेत्राचा बट्ट्याबोळ करणारा निर्णय आहे, असेच म्हणावे लागेल !

बंगालमधील विद्यापिठांमध्ये आता राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री असतील ‘कुलपती’ !

ही ममता बॅनर्जी सरकारची हुकूमशाही आहे, असेच म्हणावे लागेल. स्वार्थासाठी शिक्षणक्षेत्रात राजकारण करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासारख्या राजकरणी कधीतरी जनहित साधतील का ?

‘मदरसा’ शब्दाचे अस्तित्व आता संपुष्टात आले पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

भाजपशासित अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही अशी रोखठोक भूमिका घेऊन खर्‍या अर्थाने विकास साधला पाहिजे !

अल्पसंख्यांकवाद !

अशा सोयीच्या अल्पसंख्यांकवादाला वैध मार्गाने विरोध होणे आवश्यक आहे. यासाठी जागरूक पालकांनी केजरीवाल यांच्या या पक्षपाती निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले पाहिजे; कारण बऱ्याचदा असे निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकत नसल्याचा इतिहास आहे. अशांना न्यायालयाकडून चाप मिळाली की, त्यांची ढोंगी धर्मनिरपेक्षता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येईल !

सेंट अँड्र्यूज मराठी चर्चच्या शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार !

हिंदु विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याची मागणी

मुंबईतील बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असलेल्या ‘सेंट अँड्र्यूज मराठी चर्च’च्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार बायबल !

बहुसंख्य विद्यार्थी हिंदु असतांना त्यांना भगवद्गीता शिकवण्यापेक्षा बायबल शिकवणाऱ्या ख्रिस्त्यांच्या या षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंनी जागरूक होऊन याविषयी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी !