‘जागतिक’ महासत्तेच्या दिशेने भारत !

जागतिक अस्थिरता माजलेली असतांना भारताचे रूप मात्र सोन्यासारखे उजळून निघत आहे. एकूण स्थिती अन् रशियासमवेत अमेरिका, इराण आदी देशांशी असलेले ‘स्वतंत्र’ चांगले संबंध भारताला आगामी जागतिक महासत्तेकडे घेऊन जायला पुरेसे आहेत, असे केवळ विचार नव्हे, तर प्रत्यक्ष जागतिक घडामोडी जोरकसपणे सांगत आहेत !

भोंग्यांचा धर्म आणि ‘राज’ कारण !

३ राज्यांत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणे, कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा, तसेच मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होणे, काश्मिरींवरील अन्यायाला अमेरिकेतील मानवाधिकार संघटनेने वंशविच्छेद घोषित करणे, हलालविरोधात जागृती होणे आणि परत अवैध भोंग्यांचा विषय वर येणे, हे कालसुसंगत घडत आहे. हिंदूंनी मात्र आता धर्माच्या बाजूने रहायचे कि अधर्माच्या याचा निर्णय वेळोवेळी घ्यायचा आहे !

पाकिस्तानी लोकशाही !

पाकचा जन्म झाल्यापासून गेल्या ७५ वर्षांत एकाही सरकारने त्याचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. यामागे विविध कारणे असली, तरी मुख्य कारण हे पाकचे सैन्य आहे. त्यातही लोकांनी सरकार निवडून दिले, तरी सैन्याचे धोरण आणि आदेश यांनुसारच ते काम करत असल्याचे पाकच्या जनतेलाही ठाऊक असते.

श्रीलंकेतील आणीबाणी !

अर्थव्यवस्था देशाबाहेरील गोष्टींवर अवलंबून असल्यास काय हाल होऊ शकतात ? हेसुद्धा श्रीलंकेच्या उदाहरणातून दिसते. चीनसारख्या धूर्त आणि कपटी देशाकडून कर्ज घेतल्यास भोगावे लागणारे दुष्परिणामही दिसतात. यातून भारताने बोध घ्यावा. एकूणच राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून आर्थिक धोरणे आखल्यास श्रीलंकेसारखी वाईट परिस्थिती येणार नाही, हे निश्चित !

…तर मराठीत बोलण्यासाठीही कायदा करावा लागेल !

खऱ्या अर्थाने मराठी भाषा वाचवायची असेल, तर प्रथम त्याविषयी आत्मीयता निर्माण करण्याचे काम शासनकर्त्यांनी निर्माण करणे आवश्यक आहे. तसे झाले, तर मातृभाषेला वाचवण्यासाठी कायदे करण्याची आवश्यकता रहाणार नाही. अन्यथा भविष्यात मराठीत बोलण्यासाठीही कायदा करण्याची वेळ येईल !

कृतीशीलतेची गुढी !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. सुराज्याच्या स्थापनेची वातावरण निर्मिती होत आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला आपल्याला कृतीशीलतेची, व्यापकत्वाची आणि राष्ट्रीयत्वाची गुढी उभारायची आहे !

आतंकवादी आणि पत्रकार !

हिंदूंविरुद्ध चालू असलेल्या जिहादी कारवाया दडपणे, हिंदू पीडित असतांना त्यांना ‘पीडा देणारे’ म्हणून दाखवणारे, हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधणारे ‘कलम’वीर हे वैचारिक आतंकवादीच होय. जिहादी आतंकवादापेक्षा हा आतंकवाद अधिक भयानक आहे. अशांचा जोरकसपणे वैचारिक प्रतिवाद करणे, ही काळाची आवश्यकता आहे !

आर्थिक जिहाद !

हलाल अर्थव्यवस्था राबवून भारतात समांतर अर्थव्यवस्था राबवण्याचा धर्मांधांचा डाव आहे. हिंदू याविषयी टोकाची भूमिका घेत असतांना त्यामागील त्यांचा शुद्ध हेतू समजून घ्यायला हवा. कर्नाटकात त्याला विरोध होऊ लागल्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारने याची नोंद घेऊन हलाल अर्थव्यवस्थेवर चाप बसवण्यासाठी पावले उचलावीत !

पाकच्या बुजगावण्या नेतृत्वाचा अस्त !

जो कुणी पदावर येईल, त्याचे काही दिवसांनी तेच हाल होतील, जे सध्या इम्रान खान यांचे होत आहेत. यासह तो आतंकवादाला खतपाणी घालील आणि भारतद्वेषही जोपासेल. त्यामुळे या दुष्टचक्रातून पाकचीच नव्हे, तर जगाची सुटका करायची असेल, तर जगानेच आता पाकच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणून त्याला नामशेष केले पाहिजे !

भारतातील माओवादाचा शेवट ?

यांना ‘सरकारी यंत्रणा उलथवून स्वतःचे सरकार स्थापन करायचे आहे’. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटापर्यंत हे नक्षलवादी पुढे गेल्याचे अन्वेषणात उघड झाले. यावरून त्यांच्या लढ्याचे स्वरूप किती गंभीर आणि देशद्रोही स्वरूपाचे आहे, हे लक्षात येते. त्यामुळे केंद्र शासनाने नक्षलवाद किंवा माओवाद समूळ नष्ट होण्याकडेच आता वाटचाल करावी !