Pejawar Swamiji Slams Mallikarjun Kharge : कुंभमेळ्यात सहभागी झालेले सर्व मूर्ख आहेत का ?

प्रयागराज कुंभपर्व २०२५

पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर टीका

पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

उडुपी (कर्नाटक) – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाकुंभमेळ्याविषयी ‘गंगानदीत डुबकी मारण्याची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा चालू आहे. गंगानदीत डुबकी मारून जनतेची गरिबी दूर होणार नाही’, असे विधान केले होते.

त्यावर पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, आम्ही या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. खर्गे यांचे विधान बालिश आहे. देश-विदेशातून असंख्य लोक कुंभमेळ्यासाठी येतात. जर तसे असेल, तर कुंभमेळ्यात सहभागी झालेले सर्व मूर्ख आहेत का ? खर्गे यांच्या विधानाचा अर्थ असाच घेतला जाईल.