Priyank Kharge Anti-Hindu Statement : (म्हणे) ‘हिंदु धर्मात समानता आणि स्वाभिमान यांद्वारे जगणे शक्य नसल्याने बौद्ध, जैन, शीख अन् लिंगायत धर्म उदयास आले !’

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांचे हिंदुद्रोही विधान !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु धर्मात समानता आणि स्वाभिमान यांद्वारे जगणे शक्य नाही; म्हणूनच आपल्या देशात बौद्ध, जैन, शीख अन् लिंगायत धर्म उदयास आले, असे विधान कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी केले आहे. ते येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रियांक खर्गे पुढे म्हणाले की, या ४ धर्मांचा जन्म हिंदु धर्माच्या विरोधातच झाला आहे. जर असे असेल, तर बसवेश्‍वर देशद्रोही होते का ? ते हिंदुविरोधी होते का ? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

संपादकीय भूमिका

  • बुद्धी नाही; मात्र तोंड आहे, म्हणून काहीही बरळणारे प्रियांक खर्गे ! असा ‘शोध’ लावल्यासाठी प्रियांक खर्गे यांना पुरस्कारच द्यायला हवा !
  • जैन आणि शीख हे हिंदु धर्मातीलच पंथ आहेत, तर लिंगायत धर्म हिंदु धर्मातील एक संप्रदाय आहे. तो वेगळा धर्म नाही. हेही ज्यांना ठाऊक नाही, तेच अशा प्रकारची हास्यास्पद विधाने करतात ! अशा विधानांमुळेच समाजात द्वेष निर्माण होत आहे. अशांवर गुन्हा नोंदवला पाहिजे !
  • जैन आणि शीख पंथ हिंदु धर्मासमवेतच आहेत. एकाच कुटुंबातील काही जण शीख, तर काही जण हिंदु धर्मानुसार आचरण करत आहेत. जैन स्वतःला हिंदु धर्मापासून कधीही वेगळे समजत नाहीत, हे ज्यांना ठाऊक आहे, ते अशा प्रकारचे विधान कधीच करणार नाहीत !