Nirdesh Singh Hate Speech : (म्हणे) ‘महाकुंभ म्हणजे अश्‍लीलता; श्रीकृष्ण, श्रीराम गुन्हेगार !’

  • निर्देश सिंह या महिलेची हिंदुद्वेषी गरळओक !

  • सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अमिता सचदेवा यांची पोलिसांत तक्रार !

पुणे – ‘एक्स’वर निर्देश सिंह नावाच्या महिलेने भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, माता सीता आणि द्रौपदी यांच्याविषयी अश्‍लील भाषेत पोस्ट करून त्यांचा अवमान केला आहे. तसेच महाकुंभमेळ्याविषयी धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केली आहे. महाकुंभ म्हणजे अश्‍लीलता असून श्रीकृष्ण आणि श्रीराम गुन्हेगार आहेत, असे विधान निर्देश सिंह हिने केले. या प्रकरणी तिच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अमिता सचदेवा यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. (धर्मरक्षणासाठी तत्परतेने कृतीशील होणार्‍या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचे अभिनंदन ! – संपादक)

हा व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक

‘सायबर पोलीस ठाण्याने या तक्रारीची त्वरित नोंद घेऊन निर्देश सिंह हिच्या विरोधात गुन्हा नोंद करावा. ‘एक्स’वरून आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकाव्यात. या कारवाईसाठी कुणी विलंब केला, तर विलंबासाठी उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांना यामध्ये उत्तरदायी धरावे. द्वेषयुक्त भाषण आणि सामाजिक सलोखा बिघडवणार्‍या अन् धार्मिक भावना दुखावणार्‍या अपमानजनक सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे’, असे विधानही अधिवक्ता सचदेवा यांनी केले.

संपादकीय भूमिका

हिंदूंमधील अतीसहिष्णुता या सद्गुणविकृतीमुळेच कुणीही उठतो आणि हिंदु देवतांचा अवमान करतो. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह या प्रवृत्तींवर वचक बसवण्यासाठी उपाय म्हणून ‘ईशनिंदा विरोधी कायद्या’ची आवश्यकता आहे. यासाठी आता हिंदूंनी संघटित होऊन केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे !