अमानुष लाठीमाराची चौकशी करून कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

मुळात हिंदुत्वनिष्ठांनी कोणतीही हुज्जत घातली नाही ना कुठला अनुचित प्रकार केला ! तरीही पोलिसांच्या लाठीमारात काही हिंदुत्वनिष्ठांची डोकी फुटून ते घायाळ झाले आहेत, तसेच येथे आलेल्या नगराध्यक्षांची कॉलरही पोलिसांनी पकडली.

नितीन देसाई यांच्या मृत्यूची राज्य शासनाकडून चौकशी होणार !

प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली असली, तरी हा मृत्यू आधुनिक सावकारी पद्धतीच्या कर्जवसुलीच्या पद्धतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करत चौकशी करण्याची मागणी केली.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशातील सर्वांत अत्याधुनिक ‘सायबर प्लॅटफॉर्म’ महाराष्ट्रात उभारणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असून हे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र ५ व्या क्रमांकावर आहे.

औरंगजेबाचे ‘स्‍टेटस’ ठेवणार्‍यांचा ‘मास्‍टरमाईंड’ कोण ? याचा शोध घ्‍या ! – आमदार नीतेश राणे, भाजप

जे औरंगजेबाला ‘आलमगिरी’(हा शब्‍द ‘विश्‍वविजेता’ या अर्थाने वापरला जातो.) म्‍हणतात, त्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या महाराष्‍ट्रात रहाण्‍याचा अधिकार नाही. अशांनी पाकिस्‍तानमध्‍ये निघून जावे.

राहुल गांधींवर दखलपात्र गुन्‍हा नोंद करा ! – रणजित सावरकर यांची मागणी

राष्‍ट्रपुरुषांची अपकीर्ती आणि चारित्र्यहनन या आरोपांखाली राहुल गांधी आणि काँग्रेसचे महाराष्‍ट्र प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांच्‍यावर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी रणजित सावरकर यांनी तक्रारीत केली आहे.

पू. भिडेगुरुजी यांच्यावरील कारवाईसाठी विधानसभेत विरोधकांचा पुन्हा गदारोळ !

‘राष्ट्रीय नेत्याविषयी कुणीही अवमानकारक वक्तव्य केल्यास कारवाई केली जाईल. वीर सावरकरांवरही काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ मध्ये ‘माफीवीर’ आणि समलैंगिक असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात येईल – देवेंद्र फडणवीस

मंदिरे अधिग्रहण करू नये, या विचाराचे आमचे सरकार आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवस्थानची नावलौकिकता पहाता व्यवस्थापन समितीकडून होणारा भ्रष्टाचार न सांगण्यासारखा आहे. देवस्थानच्या मालकीच्या मिळकतीमध्ये होणारा भ्रष्टाचार, जंगम आणि स्थावर मालमत्तेचा होणारा अपवापर रोखण्याची आवश्यकता आहे.

काँग्रेस पक्षाच्या ‘जनमानसातील शिदोरी’ मुखपत्रावर कारवाई करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री

या मुखपत्रकात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते, समलैंगिक होते, सावरकर स्वातंत्र्यलढ्यात उतरले नाहीत’, अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

ठाणे येथे समृद्धी महामार्गावर पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू !

समृद्धी महामार्गावर येथील शहापूरमधील सरंळाबे येथे पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. क्रेनद्वारे काम चालू असतांना क्रेन आणि गर्डर दोन्ही कोसळले.