माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी नेहमीच ‘एस्.टी.’ने प्रवास केला ! – देवेंद्र फडणवीस

माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी नेहमीच ‘एस्.टी.’ने प्रवास केला. ते कधीही मंत्रीपदाच्या मोहात अडकले नाहीत. विधीमंडळात त्यांनी कामगार, शेतकरी आणि वंचित यांचे प्रश्न मांडले. असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

विधी आणि न्‍याय विभागाकडून उच्‍च न्‍यायालयात जाण्‍याचा सल्ला; मात्र कार्यवाहीस दिरंगाई !

तत्‍कालीन महाविकास सरकारच्‍या काळात याविषयी ठोस निर्णय घेण्‍यात आला नव्‍हता; मात्र या वेळी महाराष्‍ट्र सदन घोटाळा प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

उपमुख्‍यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्‍याची माहिती नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांची नुकतीच गुप्‍त भेट घेतल्‍याची सर्वत्र चर्चा चालू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा !

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ऑगस्‍टपासून जपान येथे जात असून महाराष्‍ट्र आणि जपान यांच्‍या मैत्रीसंबंधांचा नवीन अध्‍याय चालू करण्‍याच्‍या दृष्‍टीने या दौर्‍यात प्रयत्न होणार आहेत.

नागपूर येथे विदर्भवाद्यांचे उपमुख्‍यमंत्र्यांच्‍या घराबाहेर आंदोलन !

कोराडीतील नवीन प्रस्‍तावित वीज प्रकल्‍प रहित करावा, स्‍वतंत्र विदर्भ राज्‍य करावे, अशा मागण्‍यांसाठी आणि अन्‍नधान्‍यावरील जी.एस्.टी.च्‍या विरोधात ऑगस्‍ट क्रांतीदिनाच्‍या निमित्ताने ९ ऑगस्‍ट या दिवशी येथे ‘विदर्भ राज्‍य आंदोलन समिती’च्‍या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्‍यात आले.

मुख्‍यमंत्र्यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली ‘पंचप्रण शपथ’  !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ ऑगस्‍ट या दिवशी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पंचप्रण शपथ दिली. ‘भारताला वर्ष २०४७ पर्यंत आत्‍मनिर्भर आणि विकसित राष्‍ट्र बनवण्‍याचे स्‍वप्‍न साकार करू. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्‍ट करू. देशाच्‍या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्‍मता बलशाली करू. देशाचे संरक्षण करणार्‍यांप्रती सन्‍मान बाळगू आणि देशाचे नागरिक म्‍हणून सर्व कर्तव्‍यांचे पालन करू, अशी पंचप्रण शपथ या वेळी सर्वांनी घेतली.

राज्‍यात ‘माझी माती, माझा देश’ अभियानाद्वारे राष्‍ट्रपुरुषांचे कार्य सर्वसामान्‍यांपर्यंत पोचवले जाणार !

अगणित हुतात्‍म्‍यांचा त्‍याग आणि बलीदान यांमुळे भारताला स्‍वातंत्र्य मिळाले. ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाद्वारे स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षाचा आपण समारोप करणार आहोत. प्रत्‍येक नागरिकाच्‍या मनात स्‍वदेश, स्‍वधर्म आणि स्‍वाभिमान जागवण्‍याचे काम या अभियानाच्‍या माध्‍यमातून होणार आहे, असे उद़्‍गार मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. केंद्रशासनाच्‍या ‘आझादी का अमृत महोत्‍सवा’च्‍या सांगतेच्‍या निमित्ताने देशभरात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबवले जाणार आहे.

औरंगजेबाचे महिमा मंडन करणार्‍यांना सोडणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

‘लव्ह जिहाद’, फसवून विवाह करणे याविषयी इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी योग्य कायदा अस्तित्वात आणू. मशिदींवरील भोंग्यांविषयीचे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या निर्देशांचे कुणी उल्लंघन करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

कोकणात कायमस्वरूपी ‘आपत्ती प्रतिसाद दल’ उभारण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा !

आमदार प्रवीण दरेकर यांच्या मागणीची नोंद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोकणात कायमस्वरूपी आपत्ती निवारण केंद्रे उभारण्यात येतील’, अशी घोषणा केली आहे.

नितीन देसाई यांच्‍या मृत्‍यूची राज्‍यशासनाकडून चौकशी होणार !

प्रसिद्ध मराठी कलादिग्‍दर्शक नितीन देसाई यांच्‍या मृत्‍यूची चौकशी करण्‍याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑगस्‍ट या दिवशी विधानसभेत केली.